शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लबतर्फे चिपळूणमधील डॉक्टरांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST

चिपळूण : येथील रोटरी क्लबतर्फे आरोग्य सेवा पुरविणाऱ्या डॉक्टरांच्या सन्मानार्थ गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत चिपळूण शहर ...

चिपळूण : येथील रोटरी क्लबतर्फे आरोग्य सेवा पुरविणाऱ्या डॉक्टरांच्या सन्मानार्थ गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत चिपळूण शहर व खेर्डी पंचक्रोशीमध्ये कार्यरत असणाऱ्या, व्यवसायासोबतच सेवाभाव जपणाऱ्या अशा डॉक्टरांची भेट घेऊन सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

मोठ्या शहरांमध्ये डॉक्टर रुग्ण नातेसंबंध कलुषित होत चालला आहे. तसे न होऊ देता सचोटीने दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान ही त्यांच्या प्रामाणिक कामाची पोचपावती ठरेल, असे मत रोटरी क्लब ऑफ चिपळूणचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसाद सागवेकर यांनी यावेळी व्यक्त केले. तर अशा कार्यक्रमांच्या सहाय्याने आवश्यक मात्र लुप्त होत चाललेली फॅमिली डॉक्‍टर ही संकल्पना आपल्या चिपळूण शहरात पुन्हा रुजण्यास मदत होईल, असे मत सचिव अविनाश पालशेतकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमामध्ये डॉ. सतीश देसाई, डॉ. यतीन जाधव, डॉ. प्रकाश पाटणकर, डॉ. नंदकुमार बर्वे, डॉ. शेखर पालकर यांच्यासह अन्य सुमारे ३५ डॉक्टर्सचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ. निनाद साडविलकर व प्रोजेक्ट चेअरमन डॉ. चिनार खातू यांनी मेहनत घेतली.

----------------------------------

चिपळूण येथील राेटरी क्लबतर्फे शहरातील डाॅक्टरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राेटरी क्लबचे अध्यक्ष प्रसाद सागवेकर यांच्यासह पदाधिकारी व डाॅक्टर उपस्थित हाेते.