शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांना धान्यच नाही!

By admin | Updated: August 5, 2016 02:04 IST

संगमेश्वर तालुका : जास्त दराने धान्य घेण्याची वेळ

देवरूख : रास्तदर धान्य दुकानांच्या मागणीप्रमाणे पुरवठा विभागाकडून धान्याचा पुरवठा न झाल्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील बहुतांश अंगणवाड्यांना धान्याची उपलब्धता झालेली नाही. यामुळे बालकांना पोषण आहार देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना बाजारातून जास्त दराने धान्य विकत घेऊन आहार द्यावा लागत आहे. प्रशासनाच्या चुकीचा फटका अंगणवाडी सेविका आणि बचत गटांना सहन करावा लागत आहे.जानेवारी ते जून या महिन्याचे धान्य अंगणवाडी सेविका वा बचत गटांना मिळालेले नाही. यामुळे अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. रास्तदर धान्य दुकानदारांशी वारंवार संपर्क साधला असता, काही अंगणवाड्यांचे धान्य प्राप्त न झाल्याचे सांगण्यात येते. यामध्ये देवरूख परिसरातील अंगणवाड्यांचा समावेश आहे. त्यांना धान्य मिळतच नाही.याबाबत पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता जिल्हा पुरवठा विभागाकडून मागणीप्रमाणे धान्य उपलब्ध न झाल्याने हा गोंधळ झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये तालुक्याची ७८ क्विंटल तांदळाची मागणी असताना केवळ ६० क्विंटल तांदूळ प्राप्त झाला आहे. यामुळे आलेल्या तांदळाप्रमाणे वाटप करताना अंगणवाड्यांचे धान्य रखडून राहिले आहे. फरकाच्या तांदळाची मागणी नवीन महिन्याच्या मागणी प्रमाणे केली आहे. यानुसार धान्य आल्यास दोन दिवसातच अंगणवाड्यांना धान्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार शिजवून देताना अंगणवाडी सेविका तसेच बचत गटांच्या महिलांना खुल्या बाजारातून धान्य खरेदी करावे लागत आहे. यात जादा रक्कम खर्च होत आहे. बालकांना उपाशी राहावे लागू नये, यासाठी हा आहार शिजवण्यासाठी पदरमोड करावी लागत आहे. लवकरात लवकर धान्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी देखील देवरुख परिसरातील अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)शिक्षण क्षेत्रातून नाराजी : पदरमोड करून पोषण आहाराची सोयसंगमेश्वर तालुक्यात गेल्या महिन्यापासून पोषण आहाराची सेवा विस्कळीत झाली आहे. धान्य वेळेवर मिळत नसल्याने जादा दराने धान्य घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.