शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

हल्ल्याचे भांडवल करु नका

By admin | Updated: August 7, 2014 00:30 IST

उमेश कोरगावकर : दीपक केसरकर यांना दिले प्रत्युत्तर

सावंतवाडी : शिवसेनेत असताना कुडाळ- पावशी येथे माझ्यावर राजकीय हल्ला हा काही गैरसमजातून झाला होता. त्या घटनेशी पालकमंत्री नारायण राणे यांचा कोणताही संबंध नव्हता. त्या हल्ल्याचे भांडवल करण्याचे केसरकरांनी थांबवावे, असे माजी नगरसेवक उमेश कोरगावकर यांनी स्पष्ट केले. येथील पर्णकुटी विश्रामगृहावर उमेश कोरगावकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी कोरगावकर म्हणाले, गेली दोन वर्षे दीपक केसरकर यांनी नाव न घेता या हल्ल्याबाबत अनेकवेळा भाषणातून उल्लेख केला आहे. शिवसेना प्रवेशावेळीही त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला. माझ्यावरील हल्ल्याचे केसरकरांनी भांडवल करू नये. अन्यथा शिवसेनेविरोधात काढलेल्या उद्गारांची अनेक कात्रणे असून ती बाहेर काढावी लागतील, असा इशाराही कोरगावकर यांनी आमदार केसरकरांना दिला. यामुळे मला मानसिक त्रास होत असून यापुढे माझ्यावरील हल्ल्याबाबत कुठेही काही बोलल्यास त्यांचे वस्त्रहरण करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे कोरगावकर यांनी सांंगितले. दीपक केसरकर नगराध्यक्ष असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या श्रीमुखात भडकाविले होते. या रागाने केसरकरांनी त्या कार्यकर्त्यांच्या घरात गुंड पाठविले होते. तेव्हा केसरकरांना दहशत समजली नाही का, असा सवाल कोरगावकर यांनी उपस्थित केला.  राजकीय हल्ल्यानंतर सहा महिने अंथरुणात असताना केसरकरांनी साधी विचारपूसही केली नव्हती. मात्र, उध्दव ठाकरे मुंबईत अ‍ॅडमिट असताना भेटावयास आले होते. त्यामुळे शिवसेनेबाबतचा आदर माझ्या मनात कायमच राहील. माझ्यावरील राजकीय हल्ला हा काही गैरसमजातून झाला होता. यात राणेंचा कोणताही संबंध नव्हता, असे कोरगावकर यांनी सांगत केसरकरांनी माझ्यावरील हल्ल्याचे भांडवल करणे थांबवावे, असेही उमेश कोरगावकर यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)