शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दबावाला भीक घालणार नाही : गावडे

By admin | Updated: February 26, 2015 00:15 IST

त्यावेळी पोलिसांनी तेथील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत तेथील काही दस्तऐवज राजापूर तहसीलदारांच्या परवानगीशिवाय ताब्यात घेतला होता.

राजापूर : बनावट दाखले प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे पुढील काही दिवसातच या प्रकरणाचा छडा लागेल, असा विश्वास पोलीस निरीक्षक विकास गावडे त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. या बोगस दाखले प्रकरणामध्ये अजून काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे. कोणताही दबाव न जुमानता दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.प्रांतांच्या खोट्या सह्या करून बोगस दाखले दिल्याचे प्रकरण गेल्या दोन आठवड्यांपासून चांगलेच गाजत आहे. या प्रकरणाच्या राजापूर पोलिसांच्या तपासाबाबत समाजाच्या सर्वच स्तरातून शंका व्यक्त केली जात होती. राजापूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना पहिल्यापासूनच मुख्य सूत्रधाराला मोकळे सोडून या प्रकरणातील सत्य पोलिसांना उजेडातच आणावयाचे नाही, असा आरोप सर्वसामान्य जनतेतून करण्यात येत होता. दुसरीकडे या प्रकरणाचे धागेदोरे शोधताना या बोगस दाखल्यांची कनेक्टिव्हीटी प्रथम पाचल व नंतर नाटे महा-ई-सेवा केंद्र्रापर्यंत असल्याचे उघड झाले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण तिघांना अटक झालेली असून त्यांची पोलीस कोठडी संपलेली आहे, तर महा-ई-सेवा केंद्र्राच्या संचालिका झोया खलिफे यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणामध्ये अजून काही संशयित आरोपी आहेत. राजापूर पोलीस त्यांच्यापर्यंत लवकरच पोहोचतील व त्यांना कायदेशीररित्या अटक केली जाईल, असा विश्वास गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.या बोगस दाखले प्रकरणाचा तपास करताना राजापूर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी राजापूर सेतू कार्यालयाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला होता. त्यावेळी पोलिसांनी तेथील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत तेथील काही दस्तऐवज राजापूर तहसीलदारांच्या परवानगीशिवाय ताब्यात घेतला होता. तो दस्तऐवज पुन्हा तहसीलदारांकडे परत केला जाईल व त्यानंतर रितसर लेखी पत्र देऊन संबंधित तपासाकामी हवा असलेला दस्तऐवज पंचासमक्ष ताब्यात घेतला जाईल, असेही यावेळी गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. (प्रतिनिधी)1राजापूर पोलिसांनी आपल्या कार्यालयातील सेतूमध्ये घुसून तेथील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत काही दस्तऐवज आपल्या परवानगीशिवाय नेला असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार गुरूनाथ हुन्नरे यांनी दिली.2नाटे येथील महा-ई सेवा केंद्राचे संचालक विलास नारकर यानी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याबाबतचे म्हणणे मांडण्यासाठी पोलिसांना ३ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली.3बोगस दाखलेप्रकरणी पाचल येथील सिध्देश नथुराम नारकर यांनीही जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता, त्यावर निर्णय देताना न्यायालयाने नारकर यांना अटक करताना ७२ तासांची नोटीस देऊन मगच अटक करावी, असे आदेश पोलिसांना दिले आहेत.