शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित होणार - उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Updated: October 6, 2023 14:38 IST

नांदेड जिल्हा रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य खात्याने गंभीर दखल घेतली आहे. मात्र रत्नागिरीमध्ये अनेक पदे रिक्त आहेत

रत्नागिरी - येथे नव्याने सुरू झालेल्या शासकीय महाविद्यालयाचा आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचा करार आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांची प्रॅक्टिकल्स जिल्हा रुग्णालयात होणार आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित होणार आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद हे त्याचे काम पाहतील आणि महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर्स जिल्हा रुग्णालयात सेवा देतील. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांची अडचण दूर होईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

नांदेड जिल्हा रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य खात्याने गंभीर दखल घेतली आहे. मात्र रत्नागिरीमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. त्यावर काय पर्याय काढणार, याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री सामंत यांनी ही माहिती दिली. रत्नागिरीतील महिला रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. तेथे शिकणाऱ्या मुलांना प्रॅक्टिकल्ससाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले जाणार आहे. तसा करार आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालय शासकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित होणार आहे. आधीचे तेथील वैद्यकीय अधिकारी आणि शासकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी मिळून अधिक दर्जेदार सेवा देतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

निधी आधीच मंजूर केला आहेशासकीय रुग्णालयातील औषधांसाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मात्र नांदेडमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झालेला नाही. आपण हा निधी १५ दिवसांपूर्वीच मंजूर केला आहे. मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांकडून प्रस्ताव वेळेत गेला नसल्याने त्यांना ते पैसे उशिरा मिळाले आहेत, असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.