शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा आरोग्य अधिकारी यांची पुणे येथे बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST

रत्नागिरी : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची पुणे येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी जिल्हा परिषदेचे तत्कालीन ...

रत्नागिरी : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची पुणे येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांची सातारा येथून रत्नागिरीत बदली झाली आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलापूरकर यांची बदली व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी शासनाकडे मे महिन्यामध्ये प्रस्ताव पाठविला होता. डॉ. कमलापूरकर या रत्नागिरी जिल्हा परिषदेत दोन वर्षांपूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर रुजू झाल्या होत्या. डॉ. कमलापूरकर यांच्या कामाबाबत अनेक तक्रारी होत्या. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या प्रस्तावाची दखल घेतली असून, डॉ. कमलापूरकर यांची बदली पुणे येथे करण्यात आली आहे.

दरम्यान, डॉ. कमलापूरकर यांच्या आधी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. त्यांनी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून १६ हजार रुपये मानधनावर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची नियुक्ती केली होती. त्यानंतर अनेक जिल्ह्यांनी डाॅ. आठल्ये यांच्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची नियुक्ती केली होती. डॉ. आठल्ये येत्या दोन दिवसांत रत्नागिरी जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर रुजू होणार आहेत.