शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४२ हरकती निकाली

By admin | Updated: February 10, 2015 00:05 IST

ग्रामपंचायत निवडणूक : रत्नागिरीतील तीन ग्रामपंचायतीत नव्याने आरक्षण

रत्नागिरी : जुलै ते डिसेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ४७२ ग्रामपंचायतींपैकी ४२ ग्रामपंचायतींकडून आरक्षणाबाबत आलेल्या हरकतींवर सुनावणी होऊन त्या निकाली काढण्यात आल्या. तालुक्यातील नाचणे, खेडशी आणि गडनरळ या तीन ग्रामपंचायतींत आज नव्याने आरक्षण काढण्यात आले.जिल्ह्यात ८४७ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी जुलै ते डिसेंबर २०१५ या कालावधीत ४७२ ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने त्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच विविध कारणांनी रिक्त झालेली पदे भरण्यासाठी काहींच्या पोटनिवडणुका एप्रिल २०१५ मध्ये होणार आहेत. जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्त्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंतच्या टप्प्यात ग्रामपंचायतींसाठी एकूण सदस्य संख्या ठरविणे व प्रारूप प्रभागरचना करणे, प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देणे, तसेच निवडणूक आरक्षणासाठी सोडत पद्धतीने प्रभागाचे आरक्षण ठरविणे आदी प्रक्रिया पार पडलेल्या आहेत.हरकती सादर करण्याची अंतिम मुदत ५ फेब्रुवारी होती. त्यानुसार जिल्ह्यातून ४२ हरकती जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी घेऊन त्या हरकती निकाली काढण्यात आल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यातील नाचणे, खेडशी आणि गडनरळ या तीन ग्रामपंचायतीमधील चिठ्यांद्वारे नव्याने आरक्षण काढण्यात आले. (प्रतिनिधी)मंडणगड (२)उमरोली, म्हाप्रळदापोली (७)दाभोळ, शिरवणे, कोंढे, गिम्हवणे, रूखी, हर्णे, गुडघेखेड (६)ऐनवरे, बोरघर, कुंभाड, चोरवणे, आवाशी, फुरूसचिपळूण (५)मार्गताम्हाणे खुर्द, नायशी, आकले, रामपूर, चिवेलीसंगमेश्वर (३)आंगवली, घेराप्रचितगड, साडवलीरत्नागिरी (१२)आगरनरळ, कळझोंडी, वाटद, गडनरळ, नांदिवडे, गावखडी, $$््िगोळप, कासारी, मिरजोळे, पाली, नाचणे, खेडशीलांजा (१)रावारीराजापूूर (६)कोळंब, दळे, करक, कार्जिर्डा, महाळुंगे, कारवली