असगोली : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर कोविड केअर सेंटरमधील सर्व रुग्णांना वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या नेत्रा ठाकूर व वेळणेश्वर गावचे माजी सरपंच नवनीत ठाकूर यांनी गरम पाणी करण्यासाठी इलेक्ट्रिक थर्मास, स्टीमर, मास्क, सॅनिटायझर अशा वस्तूंची भेट दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोविड सेंटर व रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून देतानाच आमदार भास्कर जाधव यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनाही मदतीसाठी पुढे येण्याची सूचना केली होती. त्यानुसार नेत्रा ठाकूर व नवनीत ठाकूर यांनी स्वखर्चाने कोविड सेंटरमधील रुग्णांना आवश्यक साहित्याचे वाटप केले. त्यांना या कामासाठी गुहागर रुग्णालयाचे वैद्यकीय डॉ. बळवंत, डॉ. राजेंद्र पवार, हेदवी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप गुंजवटे, डॉ. नागवेकर, आबलोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गावड, प्रणव पोळेकर यांचे सहकार्य लाभत आहे. रुग्णांना साहित्य वाटप करताना तहसीलदार लता धोत्रे, डॉ. सुबोध जाधव, परिचारिका कांबळे, सतीश मोरे, स्वप्निल गोणबरे, विनायक कांबळे, विलास कांबळे, तलाठी नीलेश पाटील उपस्थित होते.