शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पक्षाच्या पराभवाची चचा

By admin | Updated: October 29, 2014 00:15 IST

विधानसभा निवडणूक : तालुकानिहाय अहवाल प्रदेशकडे सादर्र

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दयनीय अवस्थेची दखल वरिष्ठ पातळीवरुन घेण्यात येत आहे. चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी कदम यांना अपेक्षेपेक्षा कमी मिळालेल्या मतांमुळे पक्षातील गटातटाच्या राजकारणाला पुन्हा चालना मिळणार आहे.आघाडीतील फुटीमुळे काँग्रेसने जिल्ह्यात स्वतंत्र उमेदवार उभे केले. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेल्या कदम यांना यावेळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेस बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांचा दारूण झाला होता. त्यानंतर विधानसभेसाठी पाच मतदारसंघात उभ्या असलेल्या काँग्रेस उमेदवारांची लाखातही न गेलेली मते हा प्रकार तरी काय आहे? असा संतप्त सवाल पक्षाचे ज्येष्ठ नेते विचारत आहेत. याबाबतीतील प्रत्येक उमेदवाराचा अहवाल प्रदेशकडे पाठविण्यात येत आहे. काँग्रेसची प्रदेश पातळीवरील संघटनात्मक बैठक टिळक भवनमध्ये मंगळवारी सुरु असतानाच जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर पुन्हा भर दिला जाणार आहे.रश्मी कदम यांनी स्वत:ला मिळालेल्या मतांमुळे संतप्त भावना व्यक्त केल्या. पक्षाची चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात ताकद असताना आपल्याला नगण्य मते मिळतात, याचाच अर्थ काय होतो? विरोधकांनी या निवडणुकीत पैशांचा वापर केला व पक्षाची मते इतरत्र वळविण्याचा प्रयत्न केला. हे संतापजनक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. याबाबतचा लेखी अहवाल आपण राणे यांना सुपूर्द केला असल्याचे त्यांनी सांगितले. देवरुख - संगमेश्वर भागात सुभाष बने हे शिवसेनेत दाखल झाले. रवींद्र माने यांनी राष्ट्रवादीचा प्रचार जोमाने केला. अशावेळी हक्काची असलेली मते पक्षाला का मिळाली नाहीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. आपण प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला. मतदारसंघ मोठा असल्याने सर्व ठिकाणी यंत्रणाही राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षाची इतकी दयनीय अवस्था का झाली, याला जबाबदार कोण? याचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे.जिल्ह्यात उघडउघड गटबाजी आहे. प्रत्येक निवडणुकीत ती उफाळून येते. याचाच फटका आपल्याला बसल्याचे कदम यांनी सांगितले. मात्र, हे किती दिवस चालणार, याकडे लक्ष आहे. (प्रतिनिधी)काँग्रेसची झालेली दाणादाण लक्षात घेता पुन्हा जिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरु झाली आहे. काही ठिकाणी तालुकाध्यक्षांच्या कामगिरीचा फेरआढावा घेण्यात येणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी पुढील काही काळ कसोटीचा राहणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेत बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.