शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापन; महावितरण नापास

By admin | Updated: June 10, 2015 00:29 IST

नाराजी : पावसाला काही तासच बाकी

चिपळूण : महावितरण कंपनीने पावसाळापूर्व आपत्ती व्यवस्थापनाची कामे पूर्ण केली आहेत. तरीही पावसाळ्यापूर्वीच सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरण आपल्या कामात नापास झाले आहे. पावसाळा जवळ आला की, पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती डागडुजी व उपाययोजना केली जाते. आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली अत्यावश्यक असणारी कामे पूर्ण करुन घेतली जातात. यावर्षी तर शहरातील विजेचे खांब बदलणे, ट्रान्सफार्मर बदलणे, नवीन विद्युत वाहिनी टाकणे, यासाठी गेले कित्येक दिवस वीज पुरवठा खंडित केला जात होता. ग्राहकांना वेठीस धरुन ही कामे पूर्ण करण्यात आली.महावितरणने आपली कामे पूर्ण करुनही शहरात अद्याप अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होतो. मे व जून महिन्याच्या कालावधीत मार्कंडी, काविळतळी, परशुरामनगर, रावतळे ते अगदी रेल्वेस्टेशनपर्यंतच्या परिसरात तीन वेळा अंधाराचे साम्राज्य होते. त्यामुळे या परिसरातील ग्राहक हैराण आहेत. सोमवारी रात्री २ वाजता रावतळे परिसरात विजेच्या तारांवर झाडाची फांदी पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर युनायटेड इंग्लिश स्कूल येथेही अडचण निर्माण झाली होती. रात्री २ वाजल्यापासून पहाटेपर्यंत वीज पुरवठा खंडित होता. सातत्याने चौकशी करुनही फॉल्ट अद्याप मिळाला नाही, असेच उत्तर दिले जात होते. अजून आपत्ती खऱ्या अर्थाने सुरू व्हायची आहे. एकंदरीत महावितरणच्या सुलतानशाही कारभाराचा फटका वेगवेगळ्या मार्गाने नागरिकांना बसत आहे. बिलाच्या दरवाढीचे चटके असह्य होत असतानाच सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरणबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. याबाबत नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. महावितरण कंपनीने वेळीच आपला कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)ग्राहकांना धरले जातेय वेठीस पावसाळा जवळ आल्यानंतर प्रत्येक खाते जागे होते. आरोग्य, वीज, बांधकाम ही खाती पटलावर असतात. चिपळूण शहरात महावितरण कंपनीद्वारे शहरातील डागडुजी व उपाययोजना केली जाते. धोकादायक खांब बदलणे, नवीन वाहिनी टाकणे यांसाठी शहरात गेले कित्येक दिवस वीज पुरवठा खंडित करण्यात येत होता. ग्राहकांना यासाठी वेठीस धरण्यात आल्याचा आरोप काहिनी केला आहे. कामे करूनही महावितरण ग्राहकांच्या परीक्षेत नापास झाल्याची चर्चा होत आहे.