शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाअभावी रहिवाशांची गैरसोय

By admin | Updated: December 1, 2014 00:18 IST

प्रलंबित प्रश्न : उक्ताड रहिवाशांचा संताप

चिपळूण : घर तेथे शौचालय अशी सरकारची संकल्पना असली तरी नगर परिषद प्रशासनातर्फे काही भागात सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत. जागेचा अभाव असल्याने या सार्वजनिक शौचालयावरच काही भागातील नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे. उक्ताड येथील शौचालयाची दुरवस्था झाली असून, या दुरुस्तीकडे डोळेझाक होत असल्याबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे. चिपळूण नगर परिषद प्रशासनातर्फे प्रत्येक प्रभागात सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या शौचालयाची देखभाल व दुरुस्ती नगर परिषद प्रशासन आजपर्यंत करीत आहे. घर तेथे शौचालय ही राज्य शासनाची संकल्पना असली तरी दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या जुन्या घरांना स्वतंत्र शौचालय बांधणे अवघड बनत आहे. सध्या नगर परिषद प्रशासन नवीन घर किंवा इमारत बांधताना प्रथम शौचालयाची व्यवस्था असेल तरच या घरांना अथवा इमारतींना परवानगी देत आहे. असे असले तरी काही भागात आजही सार्वजनिक शौचालये सुरु आहेत. उक्ताड येथे जुने सार्वजनिक शौचालय असून, या शौचालयाची दयनीय अवस्था झाली आहे. दरवाजे तुटले असल्याने महिलावर्गाला गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. उक्ताड शौचालयाची दुरुस्ती करण्याबाबत येथील रहिवाशांनी नगराध्यक्ष सावित्री होमकळस व मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांची भेट घेऊन निवेदनही दिले आहे. प्रशासनाकडून शौचालयाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ या प्रभागातील रहिवाशांनी उपोषणासारखा मार्गही अवलंबला. मात्र, गेल्या दोन वर्षात शौचालयाच्या दुरुस्तीबाबत कोणतीच हालचाल होत नसल्याने प्रभागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शौचालयाअभावी महिलावर्गाची कुचंबणा होत आहे. संबंधित यंत्रणेने या शौचालयाच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)घर तेथे शौचालय संकल्पना शौचालयाच्या दुरुस्तीबाबत मागणी करुनही चिपळूण नगर परिषद प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने नाराजीचा सूर. स्वच्छ भारत अभियान उपक्रमात नगर परिषद प्रशासनाने सहभाग दर्शविला असला तरी सार्वजनिक शौचालयाबाबत उदासिनता.शौचालयाचे दरवाजे तुटले असल्याने महिलावर्गात नाराजी.दयनीय अवस्था सुधारण्याची मागणी.