शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी न भरल्याने प्रवाशांची गैरसोय

By admin | Updated: November 6, 2014 22:06 IST

राज्यराणी एक्सप्रेस : ऐनवेळी खोळंबा

चिपळूण : सावंतवाडी-दादर दरम्यान धावणाऱ्या सकाळच्या राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये चिपळूण येथे पाणी न भरल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. अनेक प्रवाशांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. सावंतवाडी - दादर दरम्यान जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये चिपळूण येथे पाणी भरले जाते. मुळात कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण, मडगाव किंवा क्वचितप्रसंगी पनवेल येथे पाणी भरले जाते. अनेक गाड्या पाणी भरण्यासाठी चिपळूण येथेच थांबतात. राज्यराणी एक्स्प्रेस ही सावंतवाडी येथून सुटत असल्याने त्या गाडीमध्ये चिपळूण येथेच पाणी भरण्याची व्यवस्था आहे. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे राज्यराणी एक्स्प्रेस चिपळूण स्थानकावर आली व प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली. या गाडीत पाणी नव्हते. चिपळूण ते खेड दरम्यान प्रवाशांना पिण्यासाठी किंवा स्वच्छतेसाठी पाणी मिळाले नाही. खेड येथे क्रॉसिंगसाठी गाडी थांबली असताना प्रवाशांना खूप वेळ ताटकळत राहावे लागते. यावेळी पाण्याची गरज असूनही पाणी न मिळाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. कोकण रेल्वे प्रशासनाचे आपल्या गाड्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. केवळ पाणी भरण्यासाठी चिपळूण येथे गाड्या थांबवल्या जातात. परंतु, चिपळूण येथे प्रवाशांसाठी गाडी थांबवल्या जात नसल्याने मुळातच येथील प्रवाशांमध्ये असंतोष आहे. त्यातच तांत्रिक चुकीमुळे पाणी न भरल्यास प्रवाशांची गैरसोय होते. कोकण रेल्वे प्रशासन असे अनेक वेळा प्रवाशांना वेठीस धरत असते. कोकण रेल्वे प्रशासनाचे आपल्या गाड्यांकडे कायमचे दुर्लक्ष असते. केवळ पाणी भरण्यासाठी चिपळूण येथे गाड्या थांबवल्या जातात. मात्र प्रवाशासाठी त्या थांबविण्यात येत नसल्याने वेळोवेळी संताप व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)रेल्वे प्रशासनाच्या नावाने लाखोलीचिपळूण येथे पाणी न भरल्याने आली आफत. एक्स्प्रेसमध्ये पाणी नसल्याने खेड येथे क्रॉसिंगच्या वेळी प्रवाशांची गैरसोय. सातत्याने असे प्रकार रेल्वे प्रशासनाकडून घडत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष. कोकण रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवाशांना अनेकवेळा धरते वेठीस.