शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण तालुक्यातील अलोरे पाणीयोजना हस्तांतरणाला दिशा

By admin | Updated: August 28, 2014 22:23 IST

अलोरे ग्रामसभा : अभियंत्यांच्या ठाम भूमिकेमुळे योजना ग्रामपंचायतीकडे

शिरगाव : चिपळूण तालुक्यातील अलोरे गावाला ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा करणारी योजना चार वर्षांपूर्वीच पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण केवळ तांत्रिक सल्ला, शासन नियम, मार्गदर्शन देण्याचेच काम करते. ग्रामपंचायत पाणी पुरवठा कमिटी व ग्रामपंचायत यांनीच समन्वयाने आपल्या गावच्या पाणी योजनेची सर्व जबाबदारी पाहायची असते, अशी ठाम भूमिका अभियंता एम. बी. जाधव यांनी ग्रामसभेत मांडली आणि योजना हस्तांतरणाबाबत प्रश्नाला ग्रामसभेत दिशा मिळाली आहे. याबाबत जलसंपदा खात्याकडे पाठपुरावा करुन दीड कोटी रुपये खर्चाची योजना मंजूर करुन कार्यान्वित केली. २०१० साली ही योजना पूर्ण झाली. मात्र, आजअखेर ती ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली नाही. त्यामुळे पाणीपट्टी आकारणी करता आली नाही. गेली चार वर्षे साडेतीनशे कनेक्शनधारकांना मोफत पाणी मिळत असल्याने हा विषय गांभीर्याने पुढे आला नाही. दि. २५ रोजी ग्रामसभेत विषय चर्चेला आल्यानंतर त्या पत्राचे वाचन झाले. आम्हाला या पत्राची माहिती का दिली नाहीत? असा सवाल अध्यक्ष गजानन चव्हाण यांनी विचारला. माझ्या कार्यकाळातलेच पाणी हिशोब आणि व्यवहार मला माहीत आहेत. मागच्यांनी काही लिहिले नाही तर पुढचे मी काय लिहू? असा सवाल ग्रामसेवक काळे यांनी केला. योजनेचे सर्व लेखा परीक्षण करुन देण्याचे चव्हाण यांनी मान्य केल्यानंतर ही योजना गांभीर्याने अभ्यास करुन अगोदरच ताब्यात घेतली असती तर आज ग्रामपंचायतीला ६ लाख रुपये इतका महसूल मिळाला असता, अशी बाब निदर्शनास आणली गेली. मात्र, ही जबाबदारी कोणाची? यावर निर्णय न झाल्याने योजना चालू कशी होईल? हा धागा पकडत ग्रामसभेत यावर्षीपासून ३० रुपये प्रतिमाह पाणीपट्टी आकारण्याबाबत एकमत झाले आहे. सदानंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत शासनाच्या विविध योजना, त्यासाठीची पात्रता याबाबत चर्चात्मक निर्णय घेण्यात आले. १५ आॅगस्टच्या तहकूब ग्रामसभेतील अजेंड्यानुसार याच ग्रामसभेत शमशुद्दिन चिपळूणकर यांची दुसऱ्यांदा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी सरपंच प्रकाश मोहिते, भीमराव जाधव, संदीप जाधव, अनंत सुर्वे, इकबाल मुल्ला, वसंत चिपळूणकर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)