रत्नागिरी : काेरोना काळात विविध काेविड रुग्णालये, कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी दिला जाणारा पौष्टिक आहार जिल्हा प्रशासनाने निश्चित केला असून, त्यानुसारच सोमवार ते रविवार या आठवड्यात सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले जात आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या समितीच्या माध्यमातून ही आहाराची नियमावली तयार करण्यात आली आहे.
कोरोना रुग्णावर या विषाणूचे होणारे दूरगामी गंभीर परिणाम लक्षात घेऊन त्यादृष्टीने त्याला सकस आहार मिळणे गरजेचे असते. त्याचबरोबर विविध जीवनसत्त्वे मिळण्याच्या दृष्टीने अन्न घटकांबरोबरच त्याला अंडी, फळे, दूध हेही मिळणे गरजेचे असते. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी गरम पाणी, हळदीचे दूध घेणे फायद्याचे असते. अशा सर्व दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील विविध कोरोना रुग्णालये, कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर यामधील कोरोना रुग्णांसाठी आठवड्याचा जेवणाचा मेन्यू तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच दिवसभर या रुग्णांना हा आहार दिला जातो. विशेष म्हणजे दर दिवशी सकाळी गरम पाणी, चिक्की, उकडलेले अंडे आणि रात्री झोपताना हळदीचे दूध दिले जात आहे.
असा आहे आठवड्याचा आहार
सोमवार
सकाळी ७ वाजता गरम पाणी, शेंगदाणा चिक्की. ८.३० वाजता उकडलेले अंडे, कांदापोहे, चहा. दुपारी १ वाजता ३ चपाती, भात, डाळ, मूग उसळ, चटणी (शेंगदाणा/जवस). दुपारी ४ वाजता संत्री/मोसंबी, उकडलेले अंडे. रात्री ७ वाजताचे जेवण ३ चपाती, डाळ, भात, भेंडी भाजी.
मंगळवार
सकाळी ७ वाजता गरम पाणी, तीळ चिक्की. ८.३० वाजता उकडलेले अंडे, उपमा, चहा. दुपारी १ वाजता ३ चपाती, भात, डाळ, मटकी उसळ, चटणी (शेंगदाणा/जवस). दुपारी ४ वाजता सफरचंद, उकडलेले अंडे. रात्री ७ वाजताचे जेवण ३ चपाती, डाळ, भात, कोबी भाजी.
बुधवार
सकाळी ७ वाजता गरम पाणी, राजगिरा चिक्की. ८.३० वाजता उकडलेले अंडे, उसळपाव, चहा. दुपारी १ वाजता ३ चपाती, भात, डाळ, मांसाहारींसाठी फिश/चिकन/फ्राय करी तर शाकाहारींसाठी पनीर करी. दुपारी ४ वाजता केळ, उकडलेले अंडे. रात्री ७ वाजताचे जेवण ३ चपाती, डाळ, भात, भोपळी मिरची भाजी.
गुरुवार
सकाळी ७ वाजता गरम पाणी, शेंगदाणा लाडू. ८.३० वाजता उकडलेले अंडे, कांदा पोहे, चहा. दुपारी १ वाजता ३ चपाती, भात, डाळ, हरभरा उसळ, चटणी(शेंगदाणा/जवस). दुपारी ४ वाजता संत्री/मोसंबी, उकडलेले अंडे. रात्री ७ वाजताचे जेवण ३ चपाती, डाळ, भात, दुधी भोपळा भाजी.
शुक्रवार
सकाळी ७ वाजता गरम पाणी, तीळ लाडू. ८.३० वाजता उकडलेले अंडे, उपमा, चहा. दुपारी १ वाजता ३ चपाती, भात, डाळ, हिरवा वाटाणा उसळ, चटणी (शेंगदाणा/जवस). दुपारी ४ वाजता सफरचंद, उकडलेले अंडे. रात्री ७ वाजताचे जेवण ३ चपाती, डाळ, भात, फ्लाॅवर भाजी.
शनिवार
सकाळी ७ वाजता गरम पाणी, राजगिरा लाडू. ८.३० वाजता उकडलेले अंडे, उसळपाव, चहा. दुपारी १ वाजता ३ चपाती, भात, डाळ, राजमा उसळ, चटणी. दुपारी ४ वाजता केळी, उकडलेले अंडे. रात्री ७ वाजताचे जेवण ३ चपाती, डाळ, भात, वांगी भाजी.
रविवार
सकाळी ७ वाजता गरम पाणी, तीळ चिक्की. ८.३० वाजता उकडलेले अंडे, उपमा, चहा. दुपारी १ वाजता ३ चपाती, भात, डाळ, अख्खा मसूर उसळ, चटणी. दुपारी ४ वाजता डाळिंब, उकडलेले अंडे. रात्री ७ वाजताचे जेवण ३ चपाती, डाळ, भात, पालेभाजी (मेथी/मुळा)