शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील शिवने गावामध्ये बिबट्याची दहशत कायम

By admin | Updated: September 11, 2014 23:13 IST

शिवने येथे संचार : महिन्यानंतरही ग्रामस्थ भीतीच्या छायेत

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील शिवने गावामध्ये शिंदेवाडीतील एका घरामध्ये बिबट्या शिरल्याच्या घटनेला महिना पूर्ण होतो न होतो तोच बिबट्याचा पुन्हा दिवसाढवळ्या मुक्त संचार वाढला आहे. यामुळे शिवने गावातील ग्रामस्थ अद्याप बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत.महिनाभरापूर्वी शिवने गावातील गजानन शिंदे यांच्या घरात बिबट्या शिरल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली होती. यावेळी बिबट्याला घरात कोंडून ठेवण्याचे धाड घरातील शिंदे यांनी केले. त्यानंतर अवघ्या तासाभरात वन विभागाचे कर्मचारी व पोलीस यंत्रणा शिंदेवाडीत दाखल झाली. तब्बल साडेसात तासांच्या मोहिमेनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले नाही. स्वयंपाक खोलीतील छोट्याशा जागेतून बिबट्याने पलायन केल्याचे सकाळी निष्पन्न झाले होते.या घटनेला महिनाभराचा कालावधी होतो न होतो तोच बिबट्याने दिवसाढवळ्या मुक्त संचारास सुरुवात केल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे डोंगराळ भागातून तालुक्याच्या ठिकाणी येणारे ग्रामस्थ तसेच विद्यार्थीवर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या ४ दिवसांपासून सकाळी तसेच सायंकाळी बिबट्याची डरकाळी ग्रामस्थांच्या कानी पडत आहे. यामुळे ग्रामस्थांना सतर्क होतात. बुधवारी सायंकाळी दादासाहेब सरफरे विद्यालयातील विद्यार्थी विद्यालयातून परतत असताना डरकाळीच्या आवाजाने विद्यार्थी घाबरुन पळत सुटले. या प्रकारामुळे शिवने गावात बिबट्याची दहशत कायम आहे. त्यामुळे धोका अजूनही टळलेला नाही. हा धोका लक्षात घेऊनच वनविभागाने पिंजरा लावून या बिबट्याला पकडावे, अशी मागणी शिवने गावातील शिंदेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे. (प्रतिनिधी)