शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

देवरुखमध्ये भाजप, गुहागरला आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:07 IST

रत्नागिरी : देवरुख नगर पंचायत निवडणुकीत अनपेक्षितरीत्या भाजपने बाजी मारली असून, नगराध्यक्षपदासह सर्वाधिक जागाही जिंकल्या आहेत. गुहागर नगर पंचायतीत शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या शहर विकास आघाडीने नगराध्यक्षपदासह पंचायतीवर सत्ता काबीज केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला १७ पैकी केवळ एकच जागा जिंकता आली असल्याने हा माजी मंत्री आणि आमदार भास्कर जाधव यांना जोरदार ...

रत्नागिरी : देवरुख नगर पंचायत निवडणुकीत अनपेक्षितरीत्या भाजपने बाजी मारली असून, नगराध्यक्षपदासह सर्वाधिक जागाही जिंकल्या आहेत. गुहागर नगर पंचायतीत शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या शहर विकास आघाडीने नगराध्यक्षपदासह पंचायतीवर सत्ता काबीज केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला १७ पैकी केवळ एकच जागा जिंकता आली असल्याने हा माजी मंत्री आणि आमदार भास्कर जाधव यांना जोरदार धक्का मानला जात आहे. रत्नागिरीत एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपली जागा राखली आहे.प्रत्येकी १७ जागांसाठी देवरुख आणि गुहागर नगर पंचायतीसाठी बुधवारी मतदान झाले. गुरुवारी मतमोजणी झाली. देवरुखमध्ये नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या मृणाल शेट्ये विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या धनश्री बोरूकर, राष्ट्रवादीच्या स्मिता लाड, स्वाभिमानच्या मिताली तळेकर यांचा पराभव केला. नगरसेवकांच्या १७ पैकी आठ जागा भाजप, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आणि मनसे आघाडीने जिंकल्या आहेत. त्यातील सात जागा भाजपने, तर एक जागा मनसेने जिंकली आहे. शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन, तर काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. एक अपक्ष उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आला आहे. गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्यासह सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, शहर विकास आघाडी आणि शिवसेनेने हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला. गतवेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला फक्त एकच जागा जिंकता आली. शिवसेनेचाही एकच उमेदवार निवडून आला असला तरी शिवसेनेने पाठिंबा दिलेल्या शहर विकास आघाडीचे ९ उमेदवार निवडून आले आहेत. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे राजेश बेंडल हे शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या दीपक कनगुटकर यांना पराभूत केले. येथे भाजपला विजयाची मोठी आशा होती. मात्र, भाजपला सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे.रत्नागिरीत शिवसेनेचे नगरसेवक राजेश सावंत यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्या रिक्त जागी पुन्हा शिवसेनाच विजयी झाली आहे. शिवसेनेच्या राजन शेट्ये यांनी भाजपचे वसंत पाटील आणि राष्ट्रवादीचे सनिफ गवाणकर यांचा पराभव केला.