शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

देवरूख आमसभेत अधिकारी धारेवर

By admin | Updated: January 13, 2015 00:11 IST

बांधकाम, महावितरणवर आगपाखड : इकोसेन्सिटिव्ह गावे वगळण्याचा ठराव

देवरुख : संगमेश्वर पंचायत समितीच्या आमसभेत सोमवारी एस. टी., बांधकाम विभाग, महावितरण, कृषी, घरकुले, पाणीपुरवठा या विषयांवर सर्वाधिक चर्चा करण्यात आली. महावितरण व बांधकामच्या काही अधिकाऱ्यांना धारेवर धरत इको सेन्सिटिव्हमधील गावे वगळण्यात यावीत, असा ठराव आमसभेमध्ये मंजूर करण्यात आला.तीन तास चाललेल्या आमसभेमध्ये अनेकांना आपले प्रश्न मांडता आले नाहीत. तसेच महत्त्वाचे प्रश्न चर्चिले न गेल्याने नाराजी व्यक्त करीत सभा गुंडाळण्यात आल्याची भावना काहींनी सभागृहात बोलून दाखविली. ही आमसभा यापूर्वी दोनवेळा रद्द झाली होती. सभेमध्ये प्रथम एस. टी. या विभागापासून चर्चा करण्यात आली. यावेळी हल्ली एस. टी.मध्ये नव्याने भरती झालेल्या चालकांच्या वेगावर लगाम लावला पाहिजे, अशी मागणी विजय पांचाळ यांनी केली. तसेच अनेकांनी बसफेऱ्यांच्या अनियमिततेबाबत एस. टी. सुरु करण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. एसटीवर अनेक प्रश्न असल्याने आ. चव्हाण यांनी आगार व्यवस्थापक यांना गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना केल्या. तसेच विभागीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्या, असेही सुचित केले.याबरोबरच महावितरणच्या वर्षानुवर्षे गंजलेला पोलचा प्रश्न जैसे थे असल्याचे बोरुकर व गुरव यांनी स्पष्ट केले. पालकमंत्र्यांच्या आदेशाने एखादे काम तीन दिवसात होते, तर अन्य कामांना का इतका वेळ लागतो, असे खडे बोल आमदार चव्हाण यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच गंजलेले पोल प्राधान्याने बदलण्यात यावेत, असा निर्णय घेण्यात आला.तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक रस्ते उखडलेले असताना अधिकाऱ्यांकडून चालढकल होताना दिसत असल्याने सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता यांना आ. चव्हाण यांनी धारेवर धरत तुम्ही स्थानिक आहात तरीदेखील तुम्ही असे का वागता? तुम्ही खोत झाले आहेत अशा कडक शब्दात सुनावले. तर युयुत्सू आर्ते यांनी फणसट धनगरवाडी येथील ३० लाख रुपये खर्चून केलेला रस्ता पळविला आहे, असे सभागृहात सांगत मंजूर झालेला निधी अन्य ठिकाणी खर्च कसा झाला, याबाबत चौकशीची मागणी आर्ते यांनी केली. यापुढे तालुक्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याचे काम काणे करते? असा सवाल भाई बोरुकर, छोट्या गवाणकर यांनी उपस्थित केला.कृषीमध्ये आलेल्या विषयांची तसेच आंगवली सोनारवाडीतील घरकुलांची चौकशी करण्यात यावी, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले. तर गोळवली अंगणवाडी सेविका तसेच काही शिक्षक आपल्या शाळा सोडून पंचायत समिती आवारात फिरत असतात, त्यांची चौकशी व्हावी. याखेरीज धामणी बडदवाडी येथे २००७ मध्ये भारत निर्माणमधून पाणी पुरवण्याचे काम अद्यापही झालेले नाही, असे निदर्शनास आणून देत याकडे लक्ष देण्याची मागणी धामणीचे ग्रामस्थांनी केली.सभा आवरती घेतल्याने बावा चव्हाण, ललिता गुडेकर आदींना आपले प्रश्न आटोपते घ्यावे लागले. या सभेला आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर, पंचायत समिती सभापती मनीषा गुरव, उपसभाती संतोष डावल, नगराध्यक्ष स्वाती राजवाडे, उपनगराध्यक्ष मनीष सावंत, जिल्हा परिषद सदस्य राजेश मुकादम, विलास चाळके, वेदा फडके, माजी उपसभापती संतोष थेराडे, गटविकास अधिकारी रश्मी कुलकर्णी, तहसीलदार वैशाली माने, युयुत्सू आर्ते, नीलम हेगशेट्ये, मुख्याधिकारी शिल्पा नाईक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)