शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी भक्त आतूर...!

By admin | Updated: September 4, 2016 23:24 IST

मुंबईकर दाखल : खेड तालुक्यात गणरायांची संख्या वाढली; मूर्ती आणण्यास प्रारंभ

खेड : गणेशोत्सवानिमित्त बहुसंख्य भक्तगण मुंबई, पुणे येथून कोकणात दाखल होत आहेत़ केवळ एका दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबईकरांसह कोकणवासीय गणरायाचे स्वागतासाठी सज्ज झाले आहेत़ खेड तालुक्यात १६ सार्वजनिक गणेशोत्सवांसह १२,९१७ घरगुती मिळून एकूण १२,९३३ गणरायांचे आगमन होणार आहे़ सोमवार, ५ सप्टेंबर रोजी गणरायांचे आगमन होणार असून, गणेशोत्सव काळात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे़ खेड तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत गणरायांची संख्यादेखील वाढली आहे. गतवर्षी एकूण १२,८९५ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती़ यावर्षी ही संख्या १२,९३३ वर पोहोचली आहे.़ घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवांचे प्रमाण वाढले असून, सार्वजनिक मंडळांमध्ये आरास करण्याबाबत चढाओढ पाहायला मिळत आहे़ तालुक्यातील १२,९३३ गणरायांमध्ये दीड दिवसांचे ८८८ घरगुती व सार्वजनिक १ तसेच पाच दिवसांचे घरगुती १०,०२० व सार्वजनिक १ तर वामन द्वादशीला विसर्जन होणारे घरगुती १८ गणपती आणि अनंत चतुर्थीदिनी घरगुती १९९७ व १४ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. खेड बसस्थानकातील दीड दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव वगळता उर्वरीत १४ गणपतींचे अनंत चतुर्थीला विसर्जन होणार आहे. (प्रतिनिधी) गणपतीची आरास करण्याकरिता आवश्यक असलेले साहित्य आता बाजारपेठेत उपलब्ध असून, यामध्ये विविध आकर्षक मखरे, शामियाना, सूर्यप्रभा मुकूट, विविध फेटे आणि पगड्या, आदी बाजारात उपलब्ध आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खेड बाजारपेठेत गणेशभक्तांची खरेदीसाठी एकच झुंबड उडाली आहे. गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि होमगार्ड याबरोबरच जादा पोलीस कुमक मागविण्यात आली असून, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे़ चिपळूणमध्ये ३३ हजार सुभाष कदम ल्ल चिपळूण ‘गणपती बाप्पा मोरया... आला रे आला गणपती आला...’चा जयघोष करत मोठ्या उत्साहात व वाद्यांच्या गजरात सोमवारी घरोघरी गणेशमूर्तींचे आगमन होणार आहे. चिपळूण तालुक्यात १७ सार्वजनिक तर ३३ हजार २० घरगुती गणेशमूर्तींची उद्या (सोमवारी) प्रतिष्ठापना होणार आहे. आज (रविवार)पासून गणेशमूर्ती आणण्यास प्रारंभ झाला असून, गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. ढोल-ताशे, बेंजोच्या तालावर आज (रविवार)पासूनच घरोघरी गणरायांचे आगमन सुरु झाले आहे. हातगाडीवरुन, टेम्पोतून किंवा खासगी गाड्यांमधून तर डोक्यावरुन गणरायाच्या मूर्ती आणल्या जात होत्या. ग्रामीण भागात मोठमोठे पाट घेऊन गणेशमूर्ती आणण्यासाठी लहान मुलांसह भक्तगण जाताना दिसत होते. अनेक गणेश चित्रशाळांमधून रविवारीच मूर्ती नेण्यात आल्या. सोमवारी गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ सार्वजनिक तर १७ हजार २०० घरगुती गणेशमूर्ती स्थानापन्न होणार असून, अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ सार्वजनिक तर ५ हजार ५८० घरगुती गणरायांची प्रतिष्ठापना होणार आहे. सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ सार्वजनिक तर १० हजार २४० घरगुती गणेशांची स्थापना होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साही वातावरण असून, महामार्गावरही वाहनांची वर्दळ वाढली आहे.