शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उपनगराध्यक्ष निवडणूक शुक्रवारी

By admin | Updated: February 23, 2016 00:23 IST

रत्नागिरी पालिका : सेनेतर्फे विनय मलुष्टेंचे नाव निश्चित..

रत्नागिरी : रत्नागिरीच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या २६ फेबु्रवारीला जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेचे संजय साळवी यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. आता या पदासाठी येत्या शुक्रवारी निवडणूक होत असून, शिवसेनेतर्फे विनय तथा भय्या मलुष्टे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले. सेनेच्या विरोधात भाजपसह अन्य पक्ष उमेदवार उभा करणार का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. रत्नागिरी पालिकेत सत्तेवर येताना युतीतील सेना व भाजप घटक पक्षांनी नगराध्यक्षपद व उपनगराध्यक्षपद प्रत्येकी सव्वा वर्ष असे चार टप्प्यात घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती तुटल्याने रत्नागिरी पालिकेतील राजकीय समिकरणे बदलली आहेत. गेल्या तीन महिन्यात शहरात पाच जागांसाठी झालेल्या पोटनिवडेणुकीतही या पक्षांमध्ये सख्य नव्हते. पोटनिवडणुकीतील विजयामुळे पालिकेत शिवसेनेचे संख्याबळ १५ झाले आहे. नगराध्यक्ष असलेल्या भाजपचे संख्याबळ ८ आहे. भाजपसह उर्वरित पक्षांचे संख्याबळ १३ आहे. परिणामी उपनगराध्यक्षपद हे सेनेकडेच पुन्हा जाणार हे स्पष्ट आहे. भाजपने शब्द पाळला नाही तरी सेनेतील दुसऱ्या सदस्याला उपनगराध्यक्षपदाची संधी मिळावी यासाठीच संजय साळवी यांनी आपल्य पदाचा राजीनामा नगराध्यक्षांकडे दिला होता. येत्या २६ फेब्रुवारीला नगरपरिषदेच्या सभागृहात ही निवडणूक होणार आहे. सकाळी १० ते १२ वाजेयर्पंत उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. १२.३० वाजेपर्यंत छाननी व नंतर निवडणूक प्रक्रिया होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पालिका मुख्याधिकारी एम. बी. खोडके काम पाहणार आहेत. (प्रतिनिधी).