आंजर्ले : येत्या डिसेंबरमध्ये दापोलीत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संतोष शिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.दापोलीतील समविचारी व साहित्यिक क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येऊन दापोली शाखेची स्थापना २७ जानेवारी २०१३ रोजी करण्यात आली. शाखेकडून विभागीय मराठी साहित्य संमेलन भारतरत्नांच्या भूमीत व्हावे, अशा स्वरूपाचा प्रस्ताव परिषदेकडे यापूर्वीच देण्यात आला होता. त्यास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार हे साहित्य संमेलन डिसेंबर २०१४ मध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.निमंत्रक पद्माकर कुलकर्णी व प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या भेटीतील चर्चेदरम्यान तारीख निश्चित केली जाणार आहे. या विभागीय साहित्य संमेलनाला ज्येष्ठ गायक संगीतकार निवेदक अवधुत गुप्ते व ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन दोन दिवस चालणार आहे. ज्येष्ठ कला दिग्दर्शक दापोलीचे सुपुत्र नितीन देसाई व चंद्रशेखर बगाडे या संमेलनाचे नेपथ्य करणार आहेत.संमेलनात प्रतिथयश साहित्यिक, बाल साहित्यिक, चित्रपट नाट्य कलावंत, ज्येष्ठ पत्रकार या संमेलनात सहभागी होणार असल्याने हे संमेलन रंगतदार होणार आहे. संमेलनामध्ये विविध प्रकाशन संस्थांची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतील. संमेलनाला सुमारे १००० ते १२०० साहित्यिक, मान्यवर प्रकाशक तसेच तीन ते चार हजार साहित्यपे्रमी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. संमेलनात जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन दापोली शाखाध्यक्ष प्रा. कैलास गांधी, कार्याध्यक्ष संतोष शिर्के, प्रमुख कार्यवाह प्रसाद रानडे, दिपक सावंत, कोषाध्यक्ष मकरंद पोंक्षे यांनी केले आहे. दापोली येथे होणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे संमेलन व त्याअनुषंगाने होणाऱ्या तयारी आता सुरू झाली आहे. पावसानंतर प्रत्यक्ष कामकाजाला वेग येईल. (वार्ताहर)४यंदा डिसेंबरात महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे विभागीय साहित्य संमेलन दापोलीत रंगणार आहे४एकंदर आठ सत्रात संमेलनातील विविध कार्यक्रम होतील
डिसेंबरमध्ये दापोलीत रंगणार विभागीय साहित्य संमेलन; राज ठाकरे उद्घाटक
By admin | Updated: August 17, 2014 00:40 IST