शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
5
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
6
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
7
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
8
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
9
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
10
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
12
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
13
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
14
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
15
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
16
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
17
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
18
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
19
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
20
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट

कर चुकव्यांविरूध्द देवरूख नगरपंचायतीची मोहीम

By admin | Updated: April 4, 2015 00:02 IST

टॉवर सील : मार्च महिना संपताच पंचायतीने घेतली आक्रमक भूमिका

देवरूख : कर थकवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा सपाटा देवरूख नगरपंचायतीने लावला आहे. सोमवारी शिवाजी चौक येथील इंडस कंपनीचा (एअरटेल, वोडाफोन, आयडिया) मनोरा सील करण्यात आला. कारवाई करताच कंपनीने थकीत कर नगरपंचायतीला अदा केल्याने मनोरा कार्यन्वीत करण्यात आला. मंगळवारी टाटा डोकोमो कंपनीचा मनोरा सील करण्यात आला आहे. कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.मार्चअखेर असल्याने अनधिकृत बांधकामे पाडणे व दुकान गाळे सील करणे, कर थकीत असलेले मनोरे सील करणे, थकीत पाणी पट्टी ग्राहकांची नळजोडणी तोडणे, घरपट्टी थकीत असल्यास घरावर जप्ती आणणे अशी कडक मोहीम राबवली. यामुळे कर चुकवणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले. प्रथम चोरपऱ्या येथील मणेर यांचे अनधिकृत दुकाने सील करण्यात आले. त्यानंतर कांजिवरा येथील मनोरा सील करण्यात आला.शिवाजी चौक येथे इंडस कंपनीचा मनोरा आहे. सध्या या मनोऱ्यावर एअरटेल, वोडाफोन, आयडिया कंपन्यांची यंत्रणा बसवण्यात आली आहे. या मनोऱ्याचा गेली पाच ते सहा वर्षांचा ८१ हजार रूपये कर थकीत होता. नगरपंचायतीने वारंवार नोटीसा बजावण्यात आल्या. थकीत रक्कम भरणा करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. सोमवारीही कंपनीने हा कर न भरल्यामुळे नगरपंचायतीकडून हा मनोरा सील करण्यात आला. यामुळे तीनही कार्डधारकांना रेंज उपलब्ध नव्हती. कामकाज खोळंबल्याने कार्डधारकांनी नाराजी व्यक्त केली. मनोरा सील करण्याची कारवाई केल्यानंतर कंपनी खडबडून जागी झाली. कंपनीने मंगळवारी थकीत कर नगरपंचायतीकडे अदा करण्यात आला. यानंतर हा मनोरा पुन्हा कार्यन्वित झाला. टाटा डोकोमो कंपनीच्या मनोऱ्याचा ३७ हजार रूपये कर थकीत होता. त्यानाही वारंवार नोटीसा बजावण्यात आल्या. नोटीसांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नगरपंचायतीने हा मनोरा मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास सील करण्याची मोहीम राबवली. कार्डधारकांना याचा फटका सहन करावा लागणार आहे, या कारवाईने देवरूख शहरात प्रचंड खळबळ माजली आहे. अजून काही दिवस ही मोहीम राबविली जाणार आहे. (प्रतिनिधी)