शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल निवासस्थानासमोर धनगर बांधवांचे उपोषण

By admin | Updated: July 16, 2014 22:41 IST

४ आॅगस्टला ला जाणार, प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला इशारा

रत्नागिरी : मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण राज्यभर गाजत असताना आता धनगर समाज बांधवांनीही आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आरक्षण मिळावे, यासाठी ४ आॅगस्टपासून राज्यपालांच्या शासकीय निवासस्थानासमोर धनगर समाज बांधवांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.राज्य घटनेच्या कलम ३४२ खाली अनुसूचित जमातीतील यादीमध्ये हिंदी भाषेत धनगड व मराठी भाषेत धनगर हे दोन्ही शब्द एकाअर्थी आहेत. बिहार, हरियाणा, हिमाचलप्रदेश, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांनी धनगर जातीचा अनुसूचित जातीत समावेश केला आहे. मात्र, महाराष्ट्राने अजूनही धनगर समाजाला या जातीत समाविष्ट केलेले नाही. त्यामुळे समाजबांधव आता आक्रमक झाले आहेत. राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आपल्या समाजालाही आरक्षण मिळावे, यासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. त्यासाठी ४ आॅगस्टपासून राज्यपालांच्या निवासस्थानासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे, असा इशारा कोकण विभागप्रमुख संभाजी पाटील व जयप्रकाश हुलवान यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)‘र’चा ड झाल्याने आरक्षण लांबले?पेशवाईच्या काळात झालेला ‘ध’चा ‘मा’ सर्वश्रूत आहे. त्याच पद्धतीने धनगर समाजाला आरक्षण देताना ‘र’चा ‘ड’ झाल्याने हा समाज कित्येक वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित राहिला आहे. धनगर आणि धनगड ही एकच जात असलेला अहवाल शासनाने गेल्या ६५ वर्षांपासून नाकारल्याने आरक्षणावर गदा आल्याचे समाजबांधवांचे म्हणणे आहे.