पालक चिंतेत
रत्नागिरी : सीबीएसई व सीआयएसई बारावी बोर्डाची परीक्षा रद्द करणाऱ्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित ठेवण्यात आली आहे. या याचिकेवर दि.३ जून रोजी सुनावणी होणार आहे. यानंतर राज्य शासनाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
पेट्रोलसाठी रांगा
रत्नागिरी : बुधवार, दि.२ जूनपासून लाॅकडाऊन होणार असल्याचा धसका नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे सकाळी सात ते अकरा यावेळेत किराणा, भाजीपाला, कांदे-बटाटे खरेदीसाठी ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या. त्याशिवाय पेट्राेलपंपावरही गर्दी झाली होती. रस्त्यापर्यंत दुचाकीस्वारांनी रांगा लावल्या होत्या.
बियाणांसाठी मागणी
रत्नागिरी : जिल्ह्यात भात लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडून भात खरेदी सुरू झाली आहे. काही शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांकडून बदली बियाणे घेत आहेत. संकरित, सुधारित तसेच देशी वाण विक्रीसाठी उपलब्ध असून, भाजीपाल्याच्याही बियाणांना मागणी होत आहे.
नाैका किनाऱ्यावर
रत्नागिरी : पावसाळ्यात दोन महिने मासेमारी बंद असते. शासनाच्या आदेशानुसार मंगळवार दि. १ जूनपासून मासेमारी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावर नाैका विसावल्या आहेत. दोन महिन्यांत जाळी दुरुस्ती, नाैकांची, इंजिनची देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.