शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘क्लीष्ट’ प्रक्रियेमुळे दाखले मिळण्यास विलंब

By admin | Updated: July 21, 2016 00:55 IST

नागरिकांचे नुकसान : जुन्या पध्दतीनुसार दाखले देण्याची मागणी

रत्नागिरी : उपविभागीय अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने देण्यात येणारे नॉनक्रिमीलेअर तसेच जातीच्या दाखल्यांसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करण्याची प्रक्रिया क्लीष्ट आणि वेळकाढू असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याच्या प्रतिक्रिया जनतेमधून व्यक्त केल्या जात आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत महसूल विभागातून नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांपैकी नॉनक्रिमीलेअर व जातीचे दाखले उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने दिले जातात. परंतु प्रस्ताव तपासण्याची कार्यपद्धती वेळेचा अपव्यय करणारी आहे. यापूर्वीचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या कार्यकाळात सेतू सुविधा कार्यालयातून हे दाखले तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर ते आठ - दहा दिवसांनंतर उपविभागीय कार्यालयात जायचे. तेथे त्यांची पुन्हा तपासणी करून त्यानंतरच ते उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवले जायचे. मात्र, ही कार्यप्रणाली वेळकाढू असल्याचे राधाकृष्णन बी. यांच्या लक्षात आल्याने त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानुसार सुविधा केंद्रातून तयार करून उपविभागीय कार्यालयात पाठवलेले दाखले तेथील अव्वल कारकूनांकडून तपासण्यात यावेत, अशी महत्त्वाची सूचना त्यांनी केली होती. त्यानुसार वर्षभर हे दाखले वेळेवर मिळत होते. मात्र, सध्या ही कार्यपद्धत बदलण्यात आली आहे. सेतू सुविधा केंद्रात तयार करण्यात आलेले दाखले तहसील कार्यालयातून कारकून, अव्वल कारकून, नायब तहसीलदार तसेच तहसीलदार यांच्याकडून तपासणी होऊन तहसीलदारांच्या स्वाक्षरीने ते उपविभागीय यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात यावेत, अशी सूचना रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता ही दाखले तपासणी पद्धत अगदीच वेळकाढू झाली असल्याने दाखले मिळण्यास किती विलंब लागेल, हे सांगणे अवघड झाले आहे. जनतेच्या गैरसोयींबाबत जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दाखले व त्यांचे प्रस्ताव तहसीलदारांकडे न पाठवता पूर्वीप्रमाणेच सुविधा केंद्रातून थेट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पाठवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी जनतेतून होत आहे. (प्रतिनिधी)दाखल्यांसाठी कागदपत्र सादर करताना अनेक वेळा बनावट माहिती दिली जाते. अशावेळी त्यावर ज्याची सही असेल, त्या अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करण्याचे शासनाचे आदेश असल्याने यासाठी तहसीलदारांनी ती तपासून स्वाक्षरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी.