शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पाचजणांबाबत पक्षच निर्णय घेईल

By admin | Updated: June 17, 2016 00:47 IST

उदय सामंत : नाचणेतील नाराज सदस्यांबाबत स्पष्टोक्ती

रत्नागिरी : नाचणे उपसरपंच निवडणुकीनंतर सेनेच्या ‘त्या’ पाच सदस्यांनी आपण वेगळी भूमिका लवकरच जाहीर करू, असे म्हटल्याचे वाचनात आले. ते शिवसैनिकच आहेत. त्यांची भूमिका आपण नक्की जाणून घेऊ. मात्र, त्यांची वेगळी भूमिका वा वेगळा निर्णय असेल तर त्यांच्याबाबत पक्ष योग्य निर्णय घेईल, अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी सांगितले की, आपण शिवसेनेत दाखल झाल्यापासून आत्तापर्यंत सेनेत नवा-जुना वाद असल्याचे सातत्याने वाचनात येत आहे. मात्र, असा कोणताही वाद सेनेत नाही. सर्व शिवसैनिक एकदिलाने काम करत आहेत. पक्षात काम करताना काहीजण नाराज असू शकतात. अशांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सातत्याने पक्षात होत असतात. फणसोपची निवडणूक व नाचणे उपसरपंच निवडणूक हे दोन वेगळे विषय आहेत, असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. रत्नागिरी शहर एलईडीने झगमगल्याचा मलाही आनंद आहे. या प्रकल्पाचे स्वागत आहे. मात्र, या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजनने नगरोत्थानमधून निधी मंजूर करून दिला. याचे सर्व श्रेय तत्कालिन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना जाते. त्यांनी या योजनेचा घोळ सोडवून निधीची व्यवस्था केली नसती तर एलईडी प्रकल्प अडचणीत आला असता, असेही सामंत म्हणाले. (प्रतिनिधी)विकासकामे सहकार्यातून : पाणी योजनेत ५० त्रुटीपालिकेच्या ६८.४० कोटी खर्चाच्या प्रस्तावित वाढीव नळपाणी योजनेच्या प्रस्तावात संबंधित शासकीय समितीने ५० त्रुटी काढल्या आहेत. योजनेचा प्रस्ताव बनविणारे जीवन प्राधिकरणचे अधिकारी मुल्ला यांचीही बदली झाली आहे. योजनेच्या सादरीकरणाबाबत राजकारण करणाऱ्यांना आता आपण यात का लक्ष घातले होते हे लक्षात येईल. विकासकामे ही सर्वांच्या सहकार्यातूनच साध्य होतात. त्यामुळे रत्नागिरीची पाणी योजनाही त्रुटी दूर केल्यानंतर नक्की होईल, असे त्यांनी सांगितले.समर्थक नाहीत...शिवसेनेत माझ्याबरोबर आलेले सर्वजण शिवसैनिक म्हणूनच काम करत आहेत. माझ्यासमवेत आलेले कोणीही माझे समर्थक म्हणून काम करत नसल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना आमदार समर्थक म्हणून म्हणणे चुकीचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.