शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाग्रस्तांना आर्थिक मदत देण्याचा खो-खो संघटनेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:32 IST

रत्नागिरी : कोरोनाग्रस्त राष्ट्रीय खो-खो खेळाडूंना महाराष्ट्र खो-खो संघटनेमार्फत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

रत्नागिरी : कोरोनाग्रस्त राष्ट्रीय खो-खो खेळाडूंना महाराष्ट्र खो-खो संघटनेमार्फत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने माहिती संघटनेकडे पाठविण्याचे आवाहन राज्य संघटनेचे सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा यांनी केले आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सलग दुसऱ्या वर्षीही कोरोना महामारीमुळे जनता त्रस्त आहे. राज्य शासनाने ‘अत्यावश्यक सेवा’वगळता सर्व उद्याेगधंदे बंद करण्याबाबत कडक निर्बंध घातले आहेत. या कडक निर्बंधामुळे कित्येक मध्यमवर्गातील कुटुंबाची दोनवेळच्या जेवणाची देखील आबाळ झाली आहे. राज्यातील अनेक राष्ट्रीय खो-खो खेळाडूंची कुटुंबे होरपळली आहेत.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही कोरोनाग्रस्त गरीब होतकरू खेळाडूंना आर्थिक मदत करण्याची भूमिका घेतली आहे. भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी खेळाडूंच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव अ‍ॅॅड. गोविंद शर्मा यांनी राष्ट्रीय पातळीवर खेळलेले खो-खो खेळाडू जर कोरोनाबाधित असतील, अशा गरीब खेळाडूंची माहिती राज्य संघटनेकडे व्हॉट्सअप किंवा ईमेलद्वारे पाठवावी, असे पत्र जिल्हा सचिवांना पाठविण्यात आले आहे.