शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

भोपण खाडीतून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: July 15, 2014 23:44 IST

दापोली तालुका : निधी मंजूर होऊनही पंधरा वर्षे खाडीपुलाकडे दुर्लक्ष...

शिवाजी गोरे - दापोलीदापोली तालुक्यातील दाभीळ भोपण खाडीवर पूल व्हावा, यासाठी गेल्या ४० वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे. १९६६मध्ये दाभीळ येथे मॉडर्न हायस्कूलची स्थापना झाली व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना आशेचा किरण मिळाला. परंतु शिक्षण घेण्यासाठी होडक्याचा आधार घ्यावा लागला. गेली ४० वर्षे आपली शैक्षणिक भूक भागवण्यासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.दाभीळ येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये आपली शैक्षणिक भूक भागवण्यासाठी भोपण-पंदेरी येथील सुमारे ६० विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून त्यांना खाडी पार करावी लागत आहे. आपला पाल्य घराबाहेर पडल्यापासून घरी परत येईपर्यंत पालकांना काळजी असते. पावसाचा जोर वाढल्यास होडकाचालकसुद्धा त्यांना धोक्याचा इशारा देऊन परत पाठवतो.काही वेळा अतिवृष्टीचा इशारा दिल्यास सलग आठ दिवस शाळेला दांडी मारावी लागते. दाभीळ पंचक्रोशीत एकमेव मॉडर्न हायस्कूल आहे. या हायस्कूलमुळे शिक्षणाची सोय झाली. परंतु गेली ४० वर्षे खाडीपुलाची मागणी करुनही ग्रामस्थांच्या मागणीला यश आले नाही.युतीच्या सत्ता काळात तत्कालीनमंत्री रामदास कदम यांनी या खाडी पुलाला मंजुरी दिली होती. १९ जून १९९९ रोजी या पुलाची टेंडर नोटीस प्रसिद्ध झाली होती. ७ कोटी रुपये या खाडीपुलासाठी मंजूर झाले होते. परंतु त्यानंतर युतीचे सरकार गेले व आघाडी सरकार आले. गेली २५ वर्षे या खाडीपुलाचा भोपण ग्रामपंचायतीमार्फत पाठपुरावा सुरु आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.दाभीळ भोपण खाडीपूल मार्गी लागल्यास दळणवळणाची सोय होइल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार नाही. सरकारने विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण केले आहे. मात्र, हेच सरकार दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहेत. धोकादायक खाडीत यापूर्वी दोनवेळा दुर्घटना घडून काहींना मृत्यूला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे गावातील शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी दाभीळला पाठवण्याऐवजी काही पालक मुलींचे शिक्षणच बंद करीत आहेत. धोकादायक खाडी पार करुन शाळेत जाण्यापेक्षा शाळा सोडा, असा तगादा काही पालक विद्यार्थ्यांकडे लावत आहेत.दाभोळ मॉडर्न हायस्कूलचे मुख्याध्यापक दळवी, अकबर शमशुद्दीन, अजित तांबे, एस. एन. होनवले, एस. एम. मुस्सा, ए. एस. दळवी, एफ. आय. काववेकर, कैलास गांधी, बी. एस. शिरसाट आदी शिक्षक मुलांना प्रोत्साहीत करुन शाळेत येण्यास सांगतात.