शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

लोटेतील जखमींपैकी एकाचा मृत्यू

By admin | Updated: November 6, 2016 00:37 IST

सुप्रिया स्फोट प्रकरण : वीस दिवसात औद्योगिक वसाहतीत दुसरा बळी

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात गंभीर भाजलेल्या दोन कामगारांपैकी प्रितेश गोटल याचा आज (शनिवारी) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे नातेवाईकांकडून समजले. मागील वीस दिवसात वसाहतीतील हा दुसरा बळी असल्याने कामगारवर्गात भीतीचे वातावरण आहे. सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीत दिनांक २५ आॅक्टोबर रोजी दुसऱ्या पाळीत प्लांट सी-एच्या रिअ‍ॅक्टर नं. आर-१००४ येथील तिसऱ्या मजल्यावर मिथॅनॉल चार्ज करण्याचे काम करीत असताना स्फोट झाला होता. यात दोन कामगार गंभीर जखमी झाले होते तर उर्वरित तीनजणांना किरकोळ इजा झाली होती. गंभीर भाजलेल्या दोघांना ऐरोली (नवी मुंबई) येथील नॅशनल बर्न हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. दरम्यान, आज (शनिवारी) पहाटे यापैकी प्रितेश हरिश्चंद्र गोटल (२३, सोनगाव, ब्राह्मणवाडी) याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. याबाबत लोटे पोलिसांकडे संपर्क साधला असता, त्यांनीही याला दुजोरा दिला. दिनांक १५ आॅक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेदिवशी येथील नंदादीप केमिकल कंपनीत टाकीला वेल्ंिडग करण्याचे काम करत असताना, स्फोट होऊन तिवडी, चिपळूण येथील महेंद्र शिंदे (२६) हा जागीच मृत झाला होता. तर त्यापाठोपाठ दहा दिवसाने सुप्रिया कंपनीत रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाला होता.या वीस दिवसात लोटे वसाहतीतील दोन कंपन्यांमधील स्फोटात दोन कामगारांचा बळी गेला आहे. (वार्ताहर)गोटल कुटुंबाचा आधारस्तंभच गेलाप्रितेश याचे आई-वडील शेतकरी असून, गावात मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. प्रितेश हा अविवाहित होता. प्रितेशला एक छोटा भाऊ असून, तो शिक्षण घेत आहे. प्रितेश हा दोन वर्षांपूर्वी सुप्रिया कंपनीत ठेकेदारी पद्धतीवर कामाला लागला होता. त्यामुळे सर्व कुुटुंबाचा भार त्याच्यावरच होता.