शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

वायूगळती झाल्याने कामगाराचा मृत्यू

By admin | Updated: August 13, 2016 00:38 IST

एक गंभीर : गरूडा केमिकल्स कंपनीतील दुर्घटना

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील गरुडा केमिकल कंपनीत गुरुवारी सायंकाळी वायूगळती झाली. यामध्ये मुकेश सुभाष पवार या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य एका कामगाराची प्रकृ ती गंभीर असून, त्याच्यावर डेरवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये गरुडा केमिकल ही कंपनी सन २००१पासून कार्यरत आहे. गरुडा केमिकल कंपनी ही राजेंद्र गोगटे यांच्या मालकीची असून, या कंपनीमध्ये एम. ए. जी. सायलीक अ‍ॅसिड या केमिकलचे उत्पादन घेतले जाते. यासाठी लागणारा कच्चा माल (टुक्लोरो इथेनॉल) हे द्रवरूप रसायन ड्रममधून बाहेर काढत असताना या रसायनाचा घातक वायू हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर मिसळून त्या ठिकाणी काम करणाऱ्या मुकेश सुभाष पवार (२९, रा. नातूनगर, खेड, सध्या आवाशी) व अनिल गंगाराम हळदे (३५, रा. चिरणी, ता. खेड) या दोन कामगारांना वायूची बाधा झाली. दोन्ही कामगारांना त्वरित चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. शुक्रवारी सकाळी सात वाजता मुकेश सुभाष पवार याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. अनिल हळदे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक कैलास घोसाळकर यांनी दिली.लोटे सरपंच श्रेया चाळके व उपसरपंच सुरेंद्र गोवळकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी कंपनीला भेट दिली. संबंधित कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. लवकरच लोटे ग्रामपंचायतीमध्ये लोटे वसाहतीतील कंपनी व्यवस्थापकांची बैठक घेतली जाणार आहे. कंपन्यांमध्ये गेले काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांची संबंधितांकडून माहिती घेऊन कामगारांच्या सुरक्षिततेविषयी सुधारणा करण्याची विनंती केली जाणार असल्याची माहिती सरपंच श्रेया चाळके यांनी दिली.या घटनेची नोंद लोटे पोलिस चौकीत झाली असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. एस. काकडे करत आहेत. (वार्ताहर)चौकटसुरक्षेची साधने नाहीत ?गरुडा कंपनीमध्ये सुरक्षा साधनांची कमतरता असून, गेल्या दहा वर्षांपासून येथे काम करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधीही भरला जात नसल्याचे समजते. तसेच कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधाही पुरविल्या जात नाहीत. कंपनीमध्ये आग लागल्यास आग विझविण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे येथील कामगारांनी सांगितले.कामगारांना अपुरी माहितीगरुडा कंपनीमध्ये मुकेश सुभाष पवार हा कामगार मागील एक महिन्यापासून कामाला होता, तर अनिल हळदे हे गेली दोन वर्षे येथे काम करतात. घटना घडली त्यावेळी टुक्लोरो इथेनॉल हे रसायन दोनशे लीटरच्या ड्रममधून पन्नास लीटरच्या ड्रममध्ये खाली करण्याचे काम सुरू होते. हे काम एका रबरी पाईपच्या सहाय्याने केले जाते. मात्र, या दोन कामगारांना याची माहिती दिली गेली नसल्याने या कामगारांनी दोनशे लीटरचा ड्रम आडवा करून त्यातून टुक्लोरो इथेनॉल रसायन काढण्याचा प्रयत्न केला. तसेच या कामगारांकडे कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने नसल्याने या घातक वायूची लागण दोघांना झाली.