शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आरे-वारे होतोय धोकादायक?

By admin | Updated: September 11, 2014 23:03 IST

उपाययोजना हवी : दरडीचा धोका कायम

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे, मालगुंड व जयगड या गावांना जोडणारा जवळचा व रत्नागिरीला जाणारा आरे-वारे मार्ग दिवसेंदिवस धोकादायक होत आहे.रत्नागिरी तालुक्यातील सागरी महामार्गअंतर्गत झालेला जयगड, उंडी, रीळ, वरवडे, मालगुंड, गणपतीपुळे, भंडारपुळेमार्गे आरे-वारे रत्नागिरी हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे मार्गावर वाहने कसरत करताना दिसून येतात. यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. तसेच या मार्गावरुन जाणाऱ्या तातडीच्या रुग्णाला वा गर्भवती महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर सर्वांत जास्त खड्ड्यांचे साम्राज्य भंडारपुळे, नेवरे काजीरभाटी, कासारवेली ते शिरगाव या भागात आहे.भंडारपुळेतील अरुंद व खड्डेमय रस्ता, तीव्र उतारावरील वेडीवाकडी वळणे तसेच रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होते व अपघात होतात. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. भंडारपुळे ते नेवरे काजीरभाटी या दरम्यान असलेली वेडीवाकडी वळणे, अरुंद रस्ता व रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नाही. यामुळे अपघातात आणखी भर पडत आहे.भंडारपुळेतील नांदियाच्या डोंगरावरील रस्त्याच्या दुतर्फा दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी दरडी कोसळल्या देखील आहेत. तसेच आणखी दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास व वाहतूक करणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.या मार्गाची संबंधित प्रशासन व अधिकाऱ्यांनी पाहणी करुन मार्गातील अडथळे व धोके दूर करावेत, अशी मागणी गणपतीपुळे, भंडारपुळे, मालगुंड, निवेंडी आदी परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)