शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धरण उशाला, कोरड घशाला

By admin | Updated: October 1, 2016 00:17 IST

संगमेश्वर तालुका : गडनदी धरणाच्या पाण्यावाचून पायथ्याची गावे तहानलेलीच

देवरुख : संगमेश्वर तालुक्यात जलसंपदा विभागाने महत्त्वाकांक्षी असा गडनदी प्रकल्प उभा केला. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तब्बल ३३ वर्ष लागली. या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनही येथील कालवे अपूर्ण असल्याने धरणाच्या पायथ्याची असलेली शेती कोरडीच राहणार आहे. त्यामुळे ‘धरण उशाला, कोरड घशाला’ म्हणण्याची वेळ स्थानिक ग्रामस्थांवर आली आहे.गडनदी प्रकल्प उभारणीसाठी ६५१ कोटी रुपये खर्च झाला आहे. परंतु, येथील कालवे अपूर्ण असल्याने सिंंचन क्षेत्र वाढविण्याचा शासनाचा मुख्य हेतू असफल होताना दिसत आहे. गडनदी धरणाचा उजवा कालवा ४७ किलोमीटरवर आहे तर डावा कालवा हा २७ किलोमीटरवर आहे. मात्र, हे दोन्ही कालवे अपूर्णावस्थेत आहेत. सध्या धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र, कालवे नसल्याने हे पाणी सिंचनासाठी वापरता येत नाही.गडनदी धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या कुचांबे व कुंभारखणी गावांना या कालव्यांतून वगळल्याने दोनही गावातील शेती कोरडीच राहिली आहे. कुंभारखणी गावासाठी ‘रिव्हर्स’ कालवा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, स्थानिकांना हा प्रस्ताव मान्य नसल्याने तोही बारगळला. यानंतर धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या कुचांबे व कुंभारखणी गावाला लाभक्षेत्रात आणण्यासाठी धरणाला जोडून डावा कालवा तयार करण्यात यावा, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. कुंभारखणीचे सरपंच दिलीप सुर्वे यांनी ही भूमिका मांडतानाच परिसरातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ उभी करणार असल्याचे सांगितले. आधुनिक पध्दतीचा अवलंब करुन ही दोन्ही गावे कालव्याच्या लाभक्षेत्रात आणावीत यासाठी प्रयत्न सुरु असून, शेतकऱ्यांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही सुर्वे यांनी केले आहे.जलसंपदा विभाग आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कालवे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच धर्तीवर कोकणातील गडनदी धरणासह अन्य काही प्रकल्पांवर पाईपलाईनचा वापर करुन त्याद्वारे कालवे तयार करण्याची तयारी सुरु आहे. यामुळे कालव्याच्या खोदकामासाठी लागणारी शेतकऱ्यांची जमीन वाचणार असून, शासनाच्या खर्चातही कपात होणार आहे. याच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कुचांबे व कुंभारखणी या गावांसाठी कालवा तयार करावा, अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देणार असल्याचे सरपंच दिलीप सुर्वे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सक्षम बनवण्याचा हेतू : नाबार्डकडून निधीगडनदी प्रकल्पाचा पंतप्रधान कृषी सिंंचन योजनेत समावेश करण्यात आल्याने शेतकऱ्याला सक्षम बनवण्याचा केंद्रासह राज्य सरकारचा हेतू आहे. मात्र, याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्याशिवाय शेतकरी समृध्द होणार नाही. या प्रकल्प पूर्ततेसाठी शासनस्तरावर हालचाली सुरु आहेत. ‘नाबार्ड’कडून १८६ कोटी रुपये मंजूर झाले असून, उर्वरीत कामे पूर्ण करण्यासाठी मंत्रालयस्तरावर हालचाली सुरु आहेत.