शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळेतील पंचायत समिती सदस्या शिवसेनेत डेरेदाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2016 00:37 IST

राष्ट्रवादीला धक्का : पंचायत समितीत आता केवळ दोन सदस्य

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे पंचायत समिती गणाच्या राष्ट्रवादीच्या सदस्या दीक्षा मालप यांनी आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने सेनेचे संख्याबळ वाढले असून, राष्ट्रवादीत पळापळ उडाली आहे.संगमेश्वर पंचायत समितीमध्ये सध्या शिवसेना ९, राष्ट्रवादी ३, भाजप १ व बहुजन विकास आघाडी १ असे पक्षीय बलाबल असून, तालुक्यातील संघटना अधिक भक्कम करण्याहेतूने आमदार राजन साळवी यांनी राजकारणातील मुत्सद्देगिरीचे तंत्र अवलंबत दाभोळे गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या दीक्षा मालप याच्या शिवसेना प्रवेशासाठी प्रयत्न केले. आमदार साळवींच्या प्रयत्नांना जिल्हा नियोजन समिती सदस्य जया माने व जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती विलास चाळके यांची जोड मिळाली.अखेर दाभोळे सुकमवाडी येथे नूतन सभापतींंच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी दीक्षा मालप यांनी आमदान राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने पंचायत समितीमधील सेनेचे संख्याबळ १०वर गेले असून, राष्ट्रवादीचे संख्याबळ १ने कमी होऊन राष्ट्रवादीचे फक्त २ सदस्य पंचायत समितीत राहिले आहेत.दीक्षा मालप यांच्या शिवसेना प्रवेशाने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलताना आमदार राजन साळवी यांच्या विधानसभा मतदारसंघात येणारा दाभोळे हा जिल्हा परिषद गट अधिक भक्कम झाला आहे. आमदार साळवी यांनी शिवबंधन बांधून मालप यांचे सेनेत स्वागत केले. यावेळी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रप्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य जया माने, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती विलास चाळके, जिल्हा परिषद माजी सदस्या रजनी चिंगळे, विभागप्रमुख सदा कांबळे, मनोहर सुकम, अजित भोसले, कृष्णा सकपाळ, नारायण सिनकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)राजकीय खेळी : गटात वर्चस्व वाढणारशिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी भविष्यासाठी राजकीय खेळी खेळली आहे. दाभोळे जिल्हा परिषद गटावर पकड राखण्यासाठी पर्यायाने विधानसभा मतदारसंघात आपले प्राबल्य वाढवण्यासाठी साळवी यांनी आतापासूनच पावले उचलली असल्याचे यावरून दिसून येत आहे.