चिपळूण : सह्याद्रीतील पर्यटनाचे भूषण असलेला खोपी शिरगावजवळील रघुवीर घाट अनेक निसर्ग प्रेमींचे आवडते ठिकाण..!! पण त्याचा आनंद देणाऱ्या ठिकाणी जेव्हा दारूच्या बाटल्यांचे ढीग, प्रचंड प्लास्टिक कचरा, अश्लिल वागणारी तरुणाई आणि बेधुंद अवस्थेतील धिंंगाणा जेव्हा अनुभवास येतो तेव्हा ह्याला पर्यटन म्हणावे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. याच भावनांना वाट करून देण्यासाठी चिपळूणमधील सह्याद्री विकास समिती ही निसर्ग संस्था आणि लायनेस क्लब यांनी एकत्र येऊन सुसंकृत पर्यटन नावाने एक नवा जनजागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे.अशा पर्यटनाच्या ठिकाणी सुसंस्कृत-पर्यटन कसे असावे? आणि नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी? याचा संदेश देणारा कार्यक्रम २४ आॅगस्ट रोजी त्याच रघुवीर घाटात होत आहे. सह्याद्री विकास समिती या निसर्ग संस्थेच्या प्रयत्नातून चिपळूण शहरातील विविध महाविद्यालयातून स्थापन झालेल्या नेचर क्लबचे युवक - युवती या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत असून, कोयना अभयारण्याजवळील या ठिकाणाचे महत्व ओळखून वन विभाग, महसूल विभाग आणि पोलीस खात्याचे विविध अधिकारी या विधायक उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उद्या रघुवीर घाटात पोचणार आहेत.केवळ निसर्ग भटकंती न करता अशा विधायक उपक्रमातून होणाऱ्या निसर्गकार्याबद्दल सह्याद्री विकास समिती, लायनेस क्लब आणि विविध कॉलेजच्या नेचर क्लबचे विध्यार्थी यांचे नागरिक, पालक आणि शासकीय अधिकारी यांच्याकडून अभिनंदन होत असून, सर्व निसर्गप्रेमींनी उद्या सकाळी वाजता रघुवीर घाटात येऊन या निसर्ग कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सह्याद्री विकास समितीचे सचिव योगेश भागवत आणि चिपळूण लायनेस क्लबच्या प्रमुख नेत्रा रेळेकर यांनी केले आहेसह्याद्रीच्या डोंगरकपारीत अनेक पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. पावसाळ््यात रघुवीर घाटात येणाऱ्यांची कमी नसते. मात्र अशा ठिकाणी योग्य प्रकारे पर्यटकांना नंद लुटता यावा व कोणतेही अतिरेकी प्रकार येथे घडू नयेत. यासाठी सह्याद्रीशी गेली अनेक वर्षे नाते जोडलेली संस्था रविवारी हा विशेष उपक्रम राबविणार आहे. सह्याद्री विकास समिती व लायनेस क्लब व नेचर क्लबचे विद्यार्थी यांच्याकडून या पर्यटनविषयक उपक्रमाचे स्वागत केले जात आहे. (प्रतिनिधी)
रघुवीर घाटात उद्या सुसंस्कृत पर्यटन उपक्रम
By admin | Updated: August 22, 2014 23:19 IST