शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कवडीमोलाची कॅनिंग वारी

By admin | Updated: May 31, 2016 00:35 IST

बागायतदार अडचणीत : हापूसचा दिलासा नाहीच

शिवाजी गोरे -- दापोलीकोकण म्हटले की, हापूस डोळ्यासमोर येतो. कोकणचा हापूस राज्यातच नव्हे तर आता विदेशातही प्रसिद्ध आहे. आंब्याचा राजा हापूस संकटात सापडल्याने बागायतदारांच्या अडचणीत वाढ होत आहे. दरवर्षी गेल्या वर्षीचे पीक बरे होते, असे म्हणण्याची वेळ आता आंबा बागायतदारांवर येऊ लागली आहे. यावर्षी हापूस आंबा कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा देईल, असे वाटत असताना यावर्षीसुद्धा आंब्याच्या राजाने बागायतदारांना दिलासा दिलेला नाही. त्यामुळे विदर्भातील संत्र व पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांप्रमाणेच कोकणातील आंबा बागायतदार शेतकरीही अडचणीत सापडला आहे.कोकणातील रत्नागिरी, देवगड हापूस सर्वत्र प्रसिद्ध आहे. हापूसने मार्केटमध्ये चांगले नाव कमावले आहे. परंतु, हाच हापूस आता निसर्गाच्या वक्रदृष्टीत सापडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. हापूसमधील दुर्गूण म्हणजे हापूसमधील साका. हा साका दूर करण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले नाही. कारण हापूसमधील साक्यामुळे मार्के टमध्ये हापूस बदनाम होत आहे. हापूसचे मार्के टींग करण्यात शेतकरी कमी पडत असून, कोकणात कमर्शियल आंबा बागायतदारच केवळ आंब्याचे मार्के टींग करीत आहे. आंब्याच्या झाडाला कल्टारचा हाय डोस दिला जात आहे. हापूसचे पीक आता नैसर्गिकऐवजी रासायनिक होऊ लागले आहे. काही शेतकरी मात्र आजही सेंद्रीय पद्धतीने हापूसचे पीक घेत आहेत. हापूस आंब्याचे पीक घ्यायचे असेल तर शेतकऱ्याने हापूसच्या झाडांची काळजी ही घ्यायलाच हवी.मेहनत वाया... : सुरुवातीला चांगला भाव पण...३० टक्के हापूस अजूनही झाडावर!हंगामाच्या अंतिम टप्प्यात ३० टक्के आंबा अजूनही झाडावर आहे. हा आंबा कॅनिंगला पाठविला जात आहे. परंतु, कॅनिंगमधून शेतकऱ्याला फारसा फायदा होताना दिसत नाही. हापूस हंगामाच्या सुरुवातीला काही बागायतदारांना मात्र चांगला दर मिळाला. त्यानंतर कर्नाटक हापूसची ‘एंट्री’ वाशी मार्केटमध्ये झाल्याने आंब्याचे दर घसरले. आता तर कवडीमोलाने हापूस विक्री होत आहे.हापूसचे दर पडलेआंबा हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला. परंतु, ज्यांचा आंबा उशिरा तयार झाला. त्यांना मात्र दरात फटका बसला आहे. शेवटच्या टप्प्यात आता मार्केटमध्ये हापूसचे दर १०० रुपये डझन झाले असून, त्यामुळे बागायतदार शेतकऱ्याला हे दर परवडणारे नाहीत. वर्षभर मेहनत करुन हापूसला योग्य दर मिळाला नाही तर आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.आंबा नुकसानभरपाई मिळावीआंबा मोहरण्याच्या कालावधीत पाऊस पडल्याने मोहरावर करपा पडून आंब्याचे पीक हातचे गेले. यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेत आंबेच आले नाहीत. काही बागायतदारांनी मात्र योग्य मशागत करुन थोडेफार पीक घेतले आहे. परंतु, पावसामुळे कोकणातील हापूसचे पीक हातचे गेल्याने आंबा नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.