लांजा :
तीन दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी विश्रांती घेतल्याने लांजा शहरात खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे लांजा बाजारपेठ फुलून गेला हाेता.
गणेशोत्सवासाठी मुंबईहून आलेले चाकरमानी आपल्या गाड्या थांबवून खरेदी करत हाेते. कडकडीत ऊन पडल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी खरेदीसाठी धावपळ केली हाेती.
गेले तीन दिवस संततधार पडत असलेल्या पावसामुळे शहरातील व्यापारी चिंतेत हाेते. पावसाची रिपरिप सुरू राहिली तर बाजारात खरेदीसाठी नागरिक येतील की नाहीत याची चिंता होती. मात्र, गुरुवारी पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत बाजारात गर्दी होती.