रत्नागिरी : अत्यावश्यक सेवेत नसलेली आणि शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही दुकाने नियमबाह्य पद्धतीने उघडी ठेवल्याप्रकरणी रत्नागिरी शहरातील ११ दुकानदारांवर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सकाळी ११.५० ते २ वाजेपर्यंतच्या कालावधीत करण्यात आली.
पाेलिसांनी केलेल्या कारवाईत भालाराम चौधरी (३५, रा. हिंदू कॉलनी), अनुराधा सुर्वे (५०, रा. मुरुगवाडा), शकील खटीक (४२, रा. कीर्तीनगर), अदनान कास (२६, रा. कीर्तीनगर), झियाद खान (१९, रा. चांदेराई), रोहन भिंगार्डे (३४, रा. एमआयडीसी), वसंत भिंगार्डे (६९, रा. खालची आळी), यासिन अकबानी (३८, रा. गोडबोले स्टॉप), तन्वीर साखरकर (४४, रा. साखरतर), महेश चौहान (३४, रा. सह्याद्रीनगर, नाचणे), नरपत कुंपावत (५०, रा. नाचणे) या दुकानदारांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.