शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात कोरोनाबाधिताचा मृतदेह बाहेर काढून अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 14:10 IST

CoronaVirus Ratnagiri : नियमांचे पालन करून कोरोनाबाधित मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करू, अशी प्रशासनाला लेखी हमी दिल्यानंतर प्रत्यक्षात मात्र संसर्ग रोखण्याकरिता खबरदारी न घेता सफेद कपड्यामध्ये बांधून दिलेला मृतदेह बाहेर काढून धार्मिक विधी करण्याचा प्रकार शहरातील कोंढेतड येथे घडल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देराजापुरात कोरोनाबाधिताचा मृतदेह बाहेर काढून अंत्यसंस्कार तालुक्यात खळबळ, नगर परिषद प्रशासनाने घेतली दखल

राजापूर : नियमांचे पालन करून कोरोनाबाधित मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करू, अशी प्रशासनाला लेखी हमी दिल्यानंतर प्रत्यक्षात मात्र संसर्ग रोखण्याकरिता खबरदारी न घेता सफेद कपड्यामध्ये बांधून दिलेला मृतदेह बाहेर काढून धार्मिक विधी करण्याचा प्रकार शहरातील कोंढेतड येथे घडल्याचे समोर आले आहे.

या एकूणच प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली असून, या प्रकाराची नगर परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. आता प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.शहरातील कोंढेतड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाचा कोरोनाने लांजा येथे उपचार सुरू असताना मृत्यू ओढवला होता. या कोरोनाबाधित नागरिकाचा मृत्यू लांजा येथे झाल्याने तेथील नगर पंचायतीने नातेवाईकांशी संपर्क साधून मृतदेहावर तेथेच अंत्यसंस्कार करावेत, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, त्यावेळी काही पुढारी व नातेवाईकांनी मृतदेहावर आम्ही राजापुरात अंत्यसंस्कार करु, यासाठी मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली.शासकीय नियमांचे पालन करण्याची हमी देत त्यासाठी राजापूर नगर परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्रही देण्यात आले. प्रत्यक्षात मात्र अंत्यसंस्कारासाठी सफेद कपड्यात बांधून ताब्यात देण्यात आलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला व काही धार्मिक विधी करून नंतर त्या मृतदेहाचे दफन करण्यात आले.

यावेळी नगर परिषदेतील दोन कर्मचारी या अंत्यसंस्कारावर देखरेख ठेवण्यासाठी उपस्थित होते. मात्र, विधीसाठी मृतदेह प्रार्थनास्थळात नेत आहोत, असे सांगून त्यानंतर मृतदेह वेष्टनातून बाहेर काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या साऱ्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे़.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन प्रशासन जोरदार लढाई लढत असताना नागरिकच नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे उघड झाले आहे. भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी याबाबत आता प्रशासन स्तरावरून कोणते पाऊल उचलण्यात येते याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajapurराजापुरRatnagiriरत्नागिरी