रत्नागिरी : नियमित गुन्ह्यांची उकल करतानाच कोरोना रोखण्याच्या लढ्यात दिवस-रात्र पहिल्या फळीत काम करणारे पोलीस सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदानाच्या महायज्ञातही तेवढ्याच उत्साहाने सहभागी झाले आणि ‘लोकमत’ने पोलिसांसोबत आयोजित केलेले रक्तदान शिबिर यशस्वी झाले. पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रक्तदान करुन आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित केले.
‘लोकमत’चे संस्थापक संपादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा तथा बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’कडून दरवर्षी रक्तदान शिबिर घेतले जाते. यंदा कोरोनास्थितीमुळे रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीचा उपक्रम म्हणून राज्यभरातून अधिकाधिक रक्त संकलन करण्याचे ध्येय समोर ठेवून ‘लोकमत’ने रक्तदान महायज्ञ उपक्रम हाती घेतला. अशा समाजोपयोगी मोहिमेला आपला नेहमीच पाठिंबा असेल, असे सांगून पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग यांनी ‘लोकमत’ आणि रत्नागिरी पोलीस असे शिबिर घेण्याच्या प्रस्तावालाही तत्काळ होकार दिला आणि पोलीस कल्याण विभागाला लगेचच तशा सूचनाही दिल्या.
शुक्रवारी पोलिसांच्या बहुउद्देशीय सभागृहात हे शिबिर झाले. डॉ. गर्ग यांनी केवळ शिबिराला भेटच दिली नाही तर स्वत: रक्तदानही केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे हेही रक्तदानात सहभागी झाले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस उपअधीक्षक शिवाजी पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पोलीस निरीक्षक रामदास पालशेतकर, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर, पोलीस उपनिरीक्षक रेखा जाधव, पोलीस कल्याण शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे, प्रवीण घोसाळकर, प्रदीप सुपल, श्रीया साळवी, काशिनाथ गोसावी, स्थानिक गुन्हे शाखेचे अमलदार सुभाष माने उपस्थित हाेते.
जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या डाॅ. सायली झाडेकर, डाॅ. मनिषा भांगे, जनसंपर्क अधिकारी योगिता सावंत, प्रभाकर मुळेकर, विनोद पावरा, संदीप वाडेकर, सचिन फुटक यांनी रक्त संकलनाची बाजू सांभाळली.
यांनी केले रक्तदान
जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, उमाजी बजाजे, सुरज गिरी, तेजस देशमुख, सागर पवार, अमर घाडी, नरेश कोंजे, निकेतन शिंदे, कृष्णा चौधरी, शरद जाधव, अमोल दळी, रेवननाथ सोडमिर्स, सुनील भांगरे, रेश्मा चौधरी, रेखा जाधव, संतोष सावंत, अविनाश पोळ, जयदीप कळेकर, श्रीया साळवी, प्रशांत खेडेकर, संदीप महाडिक, सागर अहिरे, नारायण राऊत, प्रमोद कांबळे, प्रकाश राऊत, श्रीनिवास नाटेकर, विलास देशमुख, प्रिया मोरे, हणमंत सोनवणे, देवेंद्र मुकादम, वर्षा राऊत, प्रथमेश सावंत, विशाल कदम, दीपक पवार, नीलेश शेट्ये, कृष्णा चिमटे, रुपेश गवस, सुजय वाघमारे, सुमित गोवेकर, दिलीप शिंदे, योगेंद्र किरंजे, नितीन पुरळकर, हेमंत रासकर, तेजस नेवरेकर, कमलेश डोर्लेकर, सुयोग पडवळ.
महिलांचाही सहभाग
हिमोग्लोबिन कमी असल्याने अनेक ठिकाणी महिलांना रक्तदान करता येत नाही. मात्र, या शिबिरात पाच महिला पोलिसांनी रक्तदान केले. त्यांचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी आवर्जून कौतुक केले.