शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

corona in ratnagiri:जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी गुहागरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:53 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये २ आणि दापोली तालुक्यात ३ असे एकूण ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले़ गुहागर तालुक्यातील जामसूत येथील कोरोनाबाधित ६५ वर्षीय रुग्णाचे घरातच निधन झाले़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने तिसरा बळी घेतला.

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी गुहागरमध्येआज एकूण ५ रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण रुग्णांची संख्या ५२

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये २ आणि दापोली तालुक्यात ३ असे एकूण ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले़ गुहागर तालुक्यातील जामसूत येथील कोरोनाबाधित ६५ वर्षीय रुग्णाचे घरातच निधन झाले़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने तिसरा बळी घेतला.आज सकाळी कोल्हापूर येथून १६ अहवाल प्राप्त झाले़ त्यात ५ जणांचे अहवाल कोरोनाबाधित पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे़ तर ११ अहवाल निगेटिव्ह आले़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत कोरोबाधित रुग्णांची संख्या ५२ झाली आहे़ त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १० रुग्ण आणि मुंबई, ठाणे, पुणे येथील ४२ रुग्णांचा समावेश आहे.पहिला रुग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे आढळून आला होता़ आज पुन्हा गुहागरमध्ये २ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला़ त्यामध्ये पालशेत आणि जामसूद येथील रुग्णाचा समावेश आहे़.

जामसूद येथील पुरुष रुग्णावर मुंबईत उपचार सुरु होते़ अत्यावस्थ असल्याने त्या रुग्णाला जामसूद येथे आणण्यात आले होते़ त्याला घरीच कोरन्टाईन करुन स्वॅब घेण्यात आले़ त्याचे सोमवारी घरातच निधन झाले़ त्यानंतर आज तो रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने धावपळ उडाली आहे़.

आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे तीन रुग्ण दगावले आहेत़ त्यामध्ये खेड, दापोली आणि गुहागर या तीन तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी