शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : आता समुद्रावरही करडी नजर, विशेष गस्तीपथक तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:35 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, परदेशाप्रमाणेच मुंबई - पुणे येथून येणाऱ्यांमुळे संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. त्यातच मुंबईहून येणारे आता सागरी मार्गाचा अवलंब करून येत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशाने मुंबई - रत्नागिरी सागरी मार्गावर गस्ती अभियान सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे आता समुद्रावरही करडी नजर, विशेष गस्तीपथक तैनातमुंबईहून कोकणात येण्यासाठी नौकांचा वापर वाढला

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, परदेशाप्रमाणेच मुंबई - पुणे येथून येणाऱ्यांमुळे संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. त्यातच मुंबईहून येणारे आता सागरी मार्गाचा अवलंब करून येत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशाने मुंबई - रत्नागिरी सागरी मार्गावर गस्ती अभियान सुरू करण्यात आले आहे.देशासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे. तरीही नागरिकांमध्ये कुठलेही गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. त्यातच रत्नागिरीतील मुंबई - पुणे येथे असलेले नागरिक सध्या भीतीने रत्नागिरीत परतत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. गेल्या तीन - चार दिवसात सागरी मार्गे बोटीने काही रत्नागिरी जिल्ह्यात येऊ लागल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.जिल्ह्याला कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बाहेरून आलेल्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी माहिती देणे सक्तीचे केले असूनही ही माहिती या व्यक्ती लपवत आहे. या घटना पाहता सागरी मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीवर सक्त नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मत्स्य विभाग, कस्टम विभाग, सागरी तटरक्षक दल यांच्या समन्वयाने हे विशेष गस्ती अभियान सुरु करण्यात आले आहे.

यासाठी फिनोलेक्स कंपनीने समुद्र गस्तीसाठी खास टक बोट उपलब्ध करून दिली आहे. त्यातून सागरी मार्गावर सागरी पथकाच्या माध्यमातून आता सागरी वाहतुकीवर गस्त ठेवली जाणार आहे.प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगले, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त एन. व्ही. भादुले, विकास अधिकारी, जे. डी. सावंत, सहाय्यक बंदर निरीक्षक, सुहास गुरव आदींच्या उपस्थितीत मुंबईहून रत्नागिरी असा समुद्रमार्गे होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष गस्ती अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.रस्त्यावर तपासणी होत असल्याने समुद्रमार्गे आले..जिल्हा बंदी असतानाही वेगवेगळ्या सहा मच्छिमार बोटी करून असगोली, वेळणेश्वर येथील २१ व हेदवतड, तवसाळ, कोंडकारुळ, बोऱ्या, बुधल आदी ठिकाणचे मिळून असे ५०हून अधिक मच्छिमार गुहागर तालुक्यात पाडव्यादिवशी आले आहेत. या सर्व मच्छिमारांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर या मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने ते बोटी करून आले आहेत. यामधील बहुतांश मच्छिमार हे कामाला असलेल्या बोटींमध्येच वास्तव्य करतात. तसेच मुंबईतून रत्नागिरी तालुक्यातील वरवडे तिवरी बंदर येथे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या दोन बोटींवर कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी