शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे निर्यातीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

आंबा हंगामच यावर्षी नियोजित हंगामापेक्षा उशिरा सुरू झाला. आंबा बाजारात आला. मात्र, त्याचवेळी लॉकडाऊन सुरू झाल्याने आंबा विक्रीचा प्रश्न ...

आंबा हंगामच यावर्षी नियोजित हंगामापेक्षा उशिरा सुरू झाला. आंबा बाजारात आला. मात्र, त्याचवेळी लॉकडाऊन सुरू झाल्याने आंबा विक्रीचा प्रश्न निर्माण झाला. पणन विभागातून सद्गुरू एंटरप्राइजेसच्या माध्यमातून रत्नागिरीतून ‘थेट निर्यात’ सुरू होती. १,६१४ डझन इतकाच आंबा यावर्षी निर्यात झाला. कोरोनामुळे विमान वाहतूक बंद करण्यात आल्याने मागणी असतानाही निर्यातीसाठी सुविधा उपलब्ध न झाल्याने निर्यात थांबली. गतवर्षी कोरोनामुळे हवाईमार्गे वाहतूक बंद झाल्यानंतर जल वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, यावर्षी जल वाहतुकीचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे निर्यात थांबली.

कोरोनामुळे लॉकडाऊन असताना उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीत मागणी असतानाही निर्यात झाली नाही. यावर्षी आंबा उत्पादन कमी असताना, परदेशातून आंब्याला चांगली मागणी होती. पणन मंडळाच्या इमारतीमध्ये आंब्यावर प्रक्रिया करून आंबा पॅकिंग करून वातानुकूलित वाहनातून मुंबईतील विमानतळावर पाठविण्यात येत होता. कोरोनामुळे विमानवाहतूक सेवा बंद करण्यात आल्यामुळे निर्यात ठप्प झाली. आंबा उत्पादन कमी असतानाच, निर्यातीवर परिणाम झाला. परदेशातून आंब्याला चांगली मागणी असल्याने पणन मंडळातर्फे सद्‌गुरू एंटरप्राइजेसच्या माध्यमातून कॅनडासाठी ४५० डझन, लंडनसाठी ७८८ डझन, तर कतारसाठी ४२६ डझन आंबा निर्यात करण्यात आला.

पणन विभागाच्या माध्यमातून सद्गुरू एंटरप्राइजेसतर्फे शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात येऊन रत्नागिरीतून थेट आंबा निर्यात करण्यात येत होता. विमानसेवाच बंद झाल्यामुळे निर्यात ठप्प झाली. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी दिल्लीतील विक्रीवर विशेष भर देण्यात आला. दिल्लीत एकूण सात हजार २०० डझन आंबा पाठविण्यात आला. दिल्लीनंतर विक्रीसाठी पर्याय शोधताना, राज्यांतर्गत विक्रीवर भर देण्यात आला. वाशी येथील आंब्याचे दर गडगडले असून, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पुणे, मुंबई, नाशिक येथे शेतकऱ्यांच्या ५०० आंबा पेट्या विक्रीसाठी पाठविण्यात आल्या.

मुंबई, पुणे, नाशिक येथील ग्राहकांशी संपर्क साधून शेतकऱ्यांचा आंबा विक्रीसाठी पाठवून ५०० ते ६०० रुपये डझन दराने आंबा विक्री करण्यात आला. वाशी येथील एपीएमसी मार्केटपेक्षा राज्यांतर्गत विक्री परवडत होती. शेतकऱ्यांना हमाली, वाहतूक खर्च जाऊन दर परवडत नसल्यामुळे एपीएमसीपेक्षा जागेवरील विक्री शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली.

यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी होते. त्यातच तौउते चक्रीवादळामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कोरोनामुळे निर्यात तर रोडावलीच. शिवाय शेवटच्या टप्प्यातील आंबा पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.

कोट

स्थानिक शेतकऱ्यांना जागेवरच चांगला दर प्राप्त व्हावा, यासाठी अपेडाच्या मान्यतेने सद्‌गुरू एंटरप्राइजेसतर्फे जगातील विविध देशांपर्यंत आंबा विक्री करताना ‘थेट निर्याती’वर भर देण्यात आला होता. विमानसेवाच बंद झाल्यामुळे निर्यात ठप्प झाल्यानंतर दिल्लीसाठी बऱ्यापैकी आंबा पाठविण्यात आला. त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यांतर्गत आंबा विक्रीसाठी प्रयत्न करण्यात आले. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ग्राहकांशी संपर्क साधून विक्री करण्यात आली. मात्र, यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी राहिल्याने निर्यात रोडावली.

-प्रांजली प्रशांत नारकर, संचालिका, सद्‌गुरू एंटरप्राइजेस