शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे

By admin | Updated: March 31, 2015 00:23 IST

विजयकुमार काळम : जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार वितरण समारंभ

रत्नागिरी : शिक्षक हा समाजाचा जडणघडणीतील महत्त्वाचा घटक असून, त्यांच्या संस्कारातून आणि कल्पकतेतूनच चांगला विद्यार्थी आणि पर्यायाने चांगला समाज घडत असतो. शिक्षकांच्या या महान कार्याचा गौरव करणे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी केले.जिल्हा परिषदेच्या कै. शामराव पेजे सभागृहात आयोजित आदर्श शाळा पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, उपाध्यक्ष सतीश शेवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिष जगताप, शिक्षण समितीच्या सभापती ऐश्वर्या घोसाळकर, आरोग्य समितीचे सभापती डॉ. अनिल शिगवण, समाजकल्याण समितीच्या सभापती शीतल जाधव, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रज्ञा धनावडे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे यांच्यासह पंचायत समित्यांचे सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.काळम म्हणाले की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सत्कार्याची आणि कसं जगायचे, याची शिकवण द्यायला हवी. याचबरोबर समाजात जबाबदार नागरिक म्हणून वावरताना जागरूकपणे कसं राहायचे याचे ज्ञान विद्यार्थ्यांना द्यायला हवे. यातूनच आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक बनू शकतील, असे ते म्हणाले.पुरस्कारार्थींचे कौतुक करताना जगदीश राजापकर यांनी जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. सर्वांच्या सहकार्यातूनच आपला जिल्हा शिक्षण क्षेत्रात अग्रेसर राहील.यावेळी सतीश शेवडे, ऐश्वर्या घोसळकर, उदय बने यांची भाषणे झाली. यावेळी जिल्ह्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ गटातील आदर्श शाळांना आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनाही गौरविण्यात आले. पुरस्कारानंतर ग्रामस्थांनी मिरवणुका काढल्या. (शहर वार्ताहर)आजच्या आदर्श शाळा पुरस्काराने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता. ज्या शाळांना पुरस्कार जाहीर झाला होता, त्या त्या गावांतील ग्रामस्थ, पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थीही चार चाकी गाड्या घेऊन जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. यावेळी त्यांनी ढोल-ताशे बरोबर आणले होते. सभागृहामध्ये पुरस्कार जाहीर होताच ग्रामस्थ एकच जल्लोश करत होते. तसेच ढोल-ताशांमुळे परिषद भवनाचा परिसर दणाणला. जिल्हा परिषद भवनाचा आवारही खचाखच भरले होते. शाळेच्या पुरस्काराचा अभिमान ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसत होता.तालुकाकनिष्ठ शाळावरिष्ठ शाळामंडणगडबोरघरकेंद्रीय शाळा तिडे नं.१दापोलीमुरुड हर्णै नं.१, देहेणखेडआयनी कारभार लंबाडधामणदिवी नं.१चिपळूणकळवंडे-माडवाडीकोळकेवाडी-बोलाडगुहागरपाली देणवाडीचिखली नं.१संगमेश्वरतुरळ-डिकेवाडीचाफवली नं.१, कुंडीरत्नागिरीभोके-मठवाडीकरबुडे-मुळगावलांजाजावडे नं. ३शिरवलीराजापूरतळगाव क्र.२कोंढेतड क्र.२एकूण९११