शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सेनेची काँग्रेस करू नका : सचिन कदम

By admin | Updated: December 30, 2014 23:34 IST

सल्लावजा कानपिचक्या : संपर्क दौऱ्यात ठिकठिकाणी घेतल्या कार्यर्त्यांच्या बैठका

चिपळूण : दापोली - मंडणगड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून धडा घेऊन झालं गेलं विसरुन पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा. अंतर्गत मतभेदातून काँग्रेस संपली, हा इतिहास लक्षात ठेवा आणि शिवसेनेची काँग्रेस होऊ देऊ नका, असे आवाहन जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी दापोली तालुका कार्यकर्ता बैठकीत केले. आपल्या संपर्क दौऱ्यात कदम यांनी दापोली आणि मंडणगड तालुका कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन विचार ऐकून घेतले. येथील तालुका कार्यालयात झालेल्या या बैठकीला विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप राजपुरे, उपजिल्हाप्रमुख राजकुमार निगुडकर, तालुकाप्रमुख शांताराम पवार, शहरप्रमुख सुहास खानविलकर, युवा सेनेचे ऋषिकेश गुजर, नगराध्यक्ष जावेद मणियार, उदय जावकर, विश्वास कदम, महिला आघाडीप्रमुख उल्का जाधव, माजी सभापती रोहिणी दळवी आदी सर्व उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुखांनी कार्यकर्त्यांची मते ऐकून घेऊन त्यावर मार्गदर्शन केले. दापोली - मंडणगड मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यातला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, अंतर्गत मतभेदामुळे पराभव झाला आहे. गटातटाच्या आणि पाडापाडीच्या राजकारणात पक्षाचे नुकसान झाले आहे, हे नाकारता येणार नाही. गटातटाच्या राजकारणात राहून कार्यकर्त्यांनी संघटनेचे नुकसान होऊ देऊ नका. देशातील सर्वाधिक वर्षाची काँग्रेस केवळ अंतर्गत मतभेदामुळे आज संपली. मतभेदामुळे आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे आपला पराभव झाल्याचे त्यांचे नेते सांगत आहेत. हा राजकीय इतिहास लक्षात घेऊन त्यातून आपण बोध घेणे गरजेचे आहे. सामान्य कार्यकर्ता पक्षासाठी विविध निवडणुकांमध्ये जीवाचे रान करतो. पण, त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकांच्या वेळी अंतर्गत नाराजी, मतभेद, गटतट आडवे आले, तर त्या कार्यकर्त्यांचे राजकीय भवितव्य अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सामान्य शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुखांची शिवसेना यापलिकडे विचार न करता कार्यकर्त्यांनी पक्षाशी प्रामाणिक राहून निष्ठेने काम करावे. येत्या काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये मरगळ झटकून कामाला लागल्यास दापोलीत पुन्हा भगवे चैतन्य निर्माण होईल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. निवडणुकीनंतर संपर्कदौरा आयोजित करुन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविल्याबद्दल पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जिल्हाप्रमुखांना धन्यवाद दिले. या दौऱ्यात कदम यांनी कार्यकर्त्यांना येणाऱ्या सर्व अडचणींच्या उपाययोजनेबाबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. दापोली - मंडणगड परिसरात कदम यांनी दौरा करून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविल्याबद्दल परिसरातील कार्यकर्ते पदाधिकारी समाधान व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)...आक्रमक व्हा रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुक्यांमधून शिवसेनेची ताकद आजही तशीच आहे. दापोलीची जागा विरोधकांच्या ताकदीवर नव्हे; तर शिवसेनेतील अंतर्गत मतभेदांवर गेली. सर्वात मजबूत, सुरक्षित मतदार संघ म्हणून दापोलीकजडे पाहिले जायचे. आता तो इतिहास कायम ठेवावा. त्यासाठी संघटनेतील शिस्त पाळण्याचे व प्रसंगी आक्रमक होण्याचे धोरण पदाधिकारी, संघटकांनी स्विकारावे, असे कदम यांनी सांगितले. कानपिचक्या दापोली-मंडणगड संपर्क दौऱ्यात सचिन कदम यांनी दिल्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या.मतभेदातून काँग्रेस संपली; आपण संपूया नको.बालेकिल्ला ढासळता कामा नये , आजही ताकद आहे. मात्र, अंतर्गत मतभेदच पराभवाला कारण. गटातटाच्या व पाडापाडीच्या राजकारणाला कार्यकतेर्ही कंटाळले.शिवसेना लढवय्यांची राहावी अशी अपेक्षा.