शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

कोमसाप पुरस्कार प्रदान सोहळा

By admin | Updated: February 25, 2015 00:14 IST

प्रभाकर नाईक : जन्मभूमीतील सत्कार आयुष्य घडविणारा ठरेल

खालगाव : कोकणच्या लाल मातीतील, नारळाच्या सावलीतील व आंब्याच्या वासातील कविवर्य केशवसुतांच्या जन्मभूमीतील कोकण कलाभूषण सन्मान हा माझ्या आयुष्यातील पहिला आणि कदाचित शेवटचा गौरव आहे, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय टॅपेस्ट्री कलावंत प्रभाकर नाईक-साटम यांनी कवी केशवसूत स्मारक, मालगुंड येथे कोमसापने केलेल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.कोमसापतर्फे कोकणातील लोकप्रतिनिधींचा नाईक साटम यांचाही सत्कार झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कोकण कला अकादमीचे अध्यक्ष शिक्षक आमदार संजय केळकर होते. व्यासपीठावर कोमसापचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक, अध्यक्ष डॉ. महेश केळूसकर, सरपंच साधना साळवी, सभापती प्रकाश साळवी, विश्वस्त अरुण नेरुरकर, गजानन पाटील, अण्णा राजवाडकर, शिरीष उकिडवे, नलिनी खेर, प्रकाश आवटी, प्रशांत परांजपे, आर. एम. पाटील, एल. बी. पाटील, रेखा नार्वेकर, उषा परब, कवयित्री शोभा जोशी, स्वप्नगंधा कुलकर्णी, अचला जोशी मान्यवर कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रारंभी पुरोगामी नेते गोविंदराव पानसरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक गजानन पाटील यांनी केले. स्वागत नलिनी खेर यांनी केले. कोमसापची भूमिका अध्यक्ष केळुसकर यांनी मांडली. पुरस्कार विजेते प्रभाकर नाईक साटम, अजला जोशी, अध्यक्ष संजय केळकर यांची भाषणे झाली. प्रशांत परांजपे, गजानन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)