शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग संख्या वाढल्याने संभ्रम

By admin | Updated: November 2, 2016 23:06 IST

खेड नगर पालिका : उमेदवारांना मतदारांमध्ये करावी लागणार जागृती

श्रीकांत चाळके ल्ल खेड खेड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभागनिहाय मतदारांमध्ये मोठे बदल झाले आहेत. पूर्वीच्या तुलनेत शहरातील प्रभागांमध्ये मोठे बदल झाल्याने प्रत्येक पक्षातील उमेदवाराला आणि कार्यकर्त्याला मतदारांमध्ये जनजागृती करावी लागणार आहे. प्रभागातील उमेदवारही बदलल्याने नव्या उमेदवारांची मतदारांची समजूत काढताना चांगलीच दमछाक होणार आहे. पूर्वीच्या तुलनेत प्रत्येक प्रभागातील मतदारांमध्ये आता वाढ झाल्याने आणि उमेदवारांची संख्या देखील वाढल्याने आपला उमेदवार कोण तसेच आपण कोणाच्या पाठीशी राहायचे, याबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सन २०११मध्ये एकूण १७ सदस्य ४ प्रभागातून निवडले जात होते. प्रभागसंख्या कमी असली तरी नगरसेवक तेवढेच निवडून जात होते. त्यावेळी प्रभाग क्र. १मध्ये पुरुष मतदार १२५३ व स्त्री मतदार १२४६ मिळून २४९९ मतदार होते. गतवर्षी ८२५ पुरुष व ९४३ स्त्री मतदार मिळून १७६८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. सरासरी ७० टक्के मतदान झाले होते. याप्रमाणे प्रभाग २मध्ये १३९८ पुरुष व १४७० स्त्री मतदार मिळून २८६८ मतदार होते. यातील ९१४ पुरुष व ९८४ महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. सरासरी मतदान ६६ टक्के झाले होते. प्रभाग ३मध्ये ११४२ पुरुष व ११९६ स्त्री मतदार मिळून २३३८ मतदार होते. यातील ८१९ पुरुष व ८८४स्त्री मतदारांनी मतदान केले होते. सरासरी ७२ टक्के मतदान झाले होते, तर प्रभाग ४मध्ये १४५४ पुरुष व १५०६ स्त्री मतदार मिळून २९६० मतदार होते. यातील ९६८ पुरुष व ११४७ स्त्री मतदार मिळून २०८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळी सरासरी ७० टक्के मतदान झाले होते. सन २०११च्या जनगणनेनुसार या प्रभागाच्या संख्येत बदल झाला नव्हता. मात्र, आता या प्रभाग रचनेत ंआणि मतदारसंख्येत बदल झाला आहे. सन २०११मध्ये थेट नगराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये वैशाली कवळे निवडून आल्या होत्या. त्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यावेळच्या निवडणूक प्रक्रियेमुळे आता प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होईल, असे संकेत मिळत होते. मात्र, त्यानंतर थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक झालीच नाही. २०११मध्ये शहरातील प्रभाग संख्याही ४ होती. त्यावेळीही मतदारांच्या संख्येत फारसा बदल झाला नव्हता. तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक कुटुंबांनी मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने सोयीचे व्हावे, यासाठी शहरात भाड्याने घर घेऊन राहाणे अथवा फ्लॅट वा घर खरेदी करुन राहाणे पसंत केले होते. आजही ग्रामीण भागातून हे स्थलांतर सुरुच आहे. मात्र, मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तसेच नोकरीतील बदली किंवा निवृत्त झाल्यानंतर शहरातील भाड्याने घेतलेली घरे सोडून अथवा खरेदी केलेली घरे अन्य लोकांना विकून पुन्हा ग्रामीण भागात जाणे हे लोक पसंत करतात. अशा विविध कारणांमुळे शहरातील प्रभागातील मतदारसंख्या कमी - जास्त होत असते. याचाच मोठा परिणाम निवडणुकीतील मतदानावर होत आहे. मात्र, २००१, २००५, २०११मधील सार्वत्रिक निवडणुकीतील मतदारसंख्येमध्ये फारसा मोठा फरक नसल्याचे दिसून येत आहे. सन २०११मधील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जेवढे मतदार होते त्यापेक्षा १०० मतदार २०१६मध्ये वाढले आहेत. ५ वर्षात केवळ १०० मतदारांची भर पडल्याने २०१६च्या नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांना मिळणाऱ्या मतदारसंख्येत फारसा फरक पडणार नसल्याचेच या आकडेवाडीवरुन दिसून येत आहे. पूर्वीच्या ४ प्रभागामध्ये असलेले १०७६५ मतदार आता नव्याने झालेल्या ४ऐवजी ८ प्रभागामध्ये विभागले आहेत. छाननी प्रक्रिया बुधवारी झाल्याने उमेदवारांनी मतदारांची भेट घेतलेली नाही. आवश्यकता भासल्यास जाणीव जागृती अभियानासारखी कामे यावेळी उमेदवारांना करावी लागणार आहेत. मतदारांमध्ये सद्यस्थितीत निर्माण झालेला संभ्रम या निमित्ताने दूर होण्यास मदत होणार आहे. पूर्वी होती प्रभाग संख्या कमी; मतदार जास्त खेड शहराची लोकसंख्या २०११ म्च्या जनगणननुसार १६ हजार ८९७ आहे. त्यावेळी खेड शहरातील एकूण प्रभाग संख्या ४ होती. या प्रभागांची संख्या कमी असल्याने मतदारांची संख्या मात्र मोठी होती. प्रभाग क्र. १ ते ३ मध्ये यावेळी ४ सदस्य तर प्रभाग क्र.४ मध्ये ५ सदस्य होते. नगरपालिकेवर निवडून जात असत. मतदार उमेदवारांपासून झाले विभक्त प्रभागांची संख्या वाढल्याने पूर्वीच्या प्रभागातील सर्वच मतदार जुन्या उमेदवारांपासून विभक्त झाले आहेत तर प्रभागनिहाय आरक्षणात मोठे बदल झाल्याने काही उमेदवारांची आयात करण्यात आली आहे त्यामुळे आताच्या पालिका निवडणुकीत नवे उमेदवारांना आपली पार्श्वभूमी तेथील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन नव्याने सांगावी लागणार आहे.