शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जंगलांचे व्यापारीकरण

By admin | Updated: April 27, 2016 00:56 IST

सुरेखा दळवी : शेतीतील उत्पन्नाचे रहस्य का सांगत नाहीत?

रत्नागिरी : धरणी माता, जलजीवन आणि वनदेवता या सर्वांचे आज व्यापारीकरण झाले आहे. परंतु शेतीतून करोडो रुपयांचे उत्पन्न कसे मिळते, हे स्वत:ला शेतकरी म्हणवणारे राज्यकर्ते शेतकऱ्यांना सांगत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येते, असे परखड मत ज्येष्ठ कार्यकर्त्या अ‍ॅड़ सुरेखा दळवी यांनी व्यक्त केले.विकासाच्या नावाने विकल्या जाणाऱ्या जमिनी वाचवायच्या कशासाठी? याचे उत्तर शेतमालावरील प्रक्रिया प्रशिक्षण देणाऱ्या महिलेच्या गौरव समारंभात मिळाले, अशा शब्दात श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टतर्फे सन्मानित करण्यात आलेल्या गीतांजली जोशी यांच्याबद्दल ज्येष्ठ कार्यकर्त्या अ‍ॅड. सुरेखा दळवी यांनी गौरवोद्गार काढले. सेवाभावी वृत्तीने समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलेला श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टतर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. पाच हजार रुपये, साडी, गीताईची प्रत आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असते. शेतमालावरील प्रक्रियेच्या प्रशिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे निरपेक्ष कार्य करणाऱ्या दापोली येथील गीतांजली जोशी या पुरस्काराच्या नवव्या मानकरी ठरल्या. त्यांना हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.कृषी क्षेत्रातील प्रशिक्षणाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना केंद्र शासनाच्या पुरस्काराने यापूर्वी गौरवण्यात आले होते. हा पुरस्कार म्हणजे आईच्या मायेने ज्येष्ठांनी पाठीवर दिलेली शाबासकीची थाप आहे, अशा शब्दात जोशी यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त केले. आपले समाजसेवक वडील पांडुरंग शिंदे, आई सुलोचना आणि कृषी विद्यापीठाचे संशोधक पती डॉ. जी. डी. जोशी यांना त्यांनी आपल्या कार्याचे श्रेय दिले. प्रगतीच्या मागे धावण्यात प्रथम बळी जाणारी संवेदनशीलता जागी करणे, ही आजची खरी गरज आहे, असे प्रतिपादन हरिश्चंद्र गीते यांनी अध्यक्षीय समारोपात केले.यमुनाबाई खेर ट्रस्टच्या व्यवस्था समितीचे सदस्य बाळकृष्ण शेलार यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सत्कारमूर्तींचा परिचय समिती सदस्य प्रकाश बोरकर यांनी करुन दिला. प्रमुख पाहुण्या अ‍ॅड. सुरेखा दळवी यांचा परिचय करुन देण्याची जबाबदारी व्यवस्था समितीच्या कार्याध्यक्ष वैशाली कानिटकर यांनी पार पाडली. सत्कारमूर्ती गीतांजली जोशी आणि त्यांचे पती डॉ. जी. डी. जोशी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत ट्रस्टच्या व्यवस्था समितीचे उपाध्यक्ष गजानन चाळके यांनी या दाम्पत्याच्या परस्पर सहकार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्था समितीच्या सदस्य जयश्री बर्वे यांनी केले. समिती सदस्य प्रभाकर पवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)जिल्ह्यातही लढा : बेसुमार जंगलतोडवीटभट्टी कामगार, वेठबिगार यांच्यावरील अत्याचार आणि अन्याय यांच्याविरोधात लढा उभारणाऱ्या अ‍ॅड. सुरेखा दळवी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील बेसुमार जंगलतोडीविरूध्द आवाज उठवला होता. त्यांच्या या लढ्यानंतर रत्नागिरीत जिल्ह्यात होणाऱ्या बेसुमार जंगलतोडीला लगाम बसला होता. सुरेखा दळवी यांनी उभारलेल्या आंदोलनाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.पुरस्काराने गौरवशेतमालावरील प्रक्रियेच्या क्षेत्रात अनेक वर्षे निरपेक्ष कार्य करणाऱ्या दापोलीतील गीतांजली जोशी यांना यमुनाबाई खेर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.