शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार कायद्यासाठीच्या लढ्यात प्रसंगी रस्त्यावर उतरू

By admin | Updated: May 27, 2016 00:19 IST

हिना गावित : नंदूरबार येथे मराठी पत्रकार परिषदेतर्फे उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांचे खुले अधिवेशन

चिपळूण : पत्रकारांच्या कायद्यासाठीच्या लढ्यात आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरु, असे आश्वासनही दिले. गावित यांनी पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शनच्या मागणीला पाठिंबा देत हे मुद्दे आपण लोकसभेत उपस्थित करु, असे आश्वासन खासदार हिना गावित यांनी दिले. मात्र, पत्रकारांनी टीआरपीच्या मागे न लागता सत्य तेच दाखवावे असा सल्लाही त्यांनी दिला. नंदूरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार परिषदेच्या उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांचे खुले अधिवेशनात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस. एम. देशमुख होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी, खासदार हिना गावित, आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, सरचिटणीस यशवंत पवार, विभागीय सचिव मीना मुनोत (नाशिक), शरद पाबळे (पुणे) व हेमंत डोर्लिकर (नागपूर), आदी उपस्थित होते. पाटकर यांनी देशात कार्यकर्ते व पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याबाबत विस्ताराने माहिती दिली. अ‍ॅड. रघुवंशी यांनी पत्रकारांसाठी असलेल्या कायद्याची माहिती दिली. एखाद्या सत्य बातमीने कुणाची बदनामी होत असेल तर तीही बदनामीच्या खटल्यास पूरक ठरु शकते, असे सांगितले. आमदार रघुवंशी, किरण नाईक यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्ष देशमुख यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याचा आढावा घेत भविष्यातील योजनांची माहिती उपस्थितांना दिली. परिषद सकारात्मक, रचनात्मक पद्धतीने पत्रकारांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे सांगितले. राज्यातील तालुकाध्यक्ष, पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्षांचा मेळावा नांदेड येथे दि. ३ जुलै रोजी होणार असून, या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांनी यावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली. परिषदेच्या इतिहासात तालुकाध्यक्षांचा मेळावा प्रथमच होत असल्याचे सांगितले. भविष्यात प्रत्येक तालुका थेट परिषदेला जोडण्याचा प्रयत्न होणार असल्याने मराठी पत्रकार परिषदेने सुरु केलेली पत्रकार कल्याणाची चळवळ अधिक वर्धिष्णू होणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. पत्रकारांच्या प्रश्नांकडे सरकार करत असलेले दुर्लक्ष व राज्यातील पत्रकारांची सुरु असलेली ससेहोलपट याबद्दल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रतिनिधींपैकी अनेकांनी मनोगत व्यक्त करतानाच आपल्या भावना, प्रश्न देशमुख यांच्यासमोर मांडले. परिषदेने काय करावे यासंबंधीच्या काही कल्पनाही त्यांनी यावेळी अध्यक्षांसमोर मांडल्या. पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले. नंदूरबारसारख्या आदिवासी भागात असे अधिवेशन प्रथमच होत असल्याने या अधिवेशनाबद्दल उत्सुकता होती. अधिवेशनासाठी नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव, नगर येथील पत्रकार उपस्थित होते. योगेंद्र दोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिवेशनासाठी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)