शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या ढिगारा कोसळुन कामगाराचा मृत्यू

By admin | Updated: June 12, 2017 01:17 IST

एक गंभीर; दापोलीतील दुर्घटना

दापोली : शहरातील अर्बन सीनियर सायन्स कॉलेजशेजारी रस्त्यालगत एका इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम करून संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून एक मजूर ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. रियाज मौलासाब शिरणाळ (वय २५, रा. उकली, ता. बसवण्ण बागेवाडी, जि. विजापूर, कर्नाटक) असे मृताचे नाव आहे, तर इस्माईल मुल्ला असे जखमीचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. दापोली शहरातील अर्बन सीनियर सायन्स कॉलेजशेजारी व्यावसायिक संतोष चव्हाण यांच्या इमारतीचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम करून संरक्षक भिंतीचे काम सुरू होते. याचवेळी जेसीबीने खुदाईचे कामही सुरू होते. अचानक मातीचा भराव संरक्षक भिंतीचे काम करणारे रियाज शिरणाळ आणि इस्माईल मुल्ला यांच्या अंगावर कोसळला. त्याखाली ते गाडे गेले. भराव बाजूला काढून त्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, रियाज याचा ढिगाऱ्याखालीच मृत्यू झाला होता. गंभीर जखमी इस्माईल मुल्ला याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. धोकादायक पद्धतीने खोदकाम केल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेला विजेचा खांब दोन दिवसांपूर्वीच कोसळला होता. शेजारी राहणाऱ्या काही नागरिकांनी हे धोकादायक काम करताना सावध राहण्यास सांगितले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी रस्त्यालगत खोदकाम सुरूच ठेवले होते. रविवार सकाळपासून याठिकाणी खोदकाम सुरू होते. जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून त्याठिकाणी चिऱ्याची भिंत उभारुन इमारत व रस्ता सुरक्षित करण्याचा संबंधिताचा प्रयत्न होता. मात्र, याठिकाणी आरसीसी रिटेनिंग वॉल बांधण्याची विनंती नागरिकांनी केली होती. या कामाची तक्रार येथील नागरिक शेखर जोशी यांनी महसूलकडे दिल्याचेही सांगितले जात आहे. या अपघातानंतर ही इमारत वादात सापडली आहे. रस्त्यालगत डोंगराचे खोदकाम करून होत असलेल्या धोकादायक कामामुळे येथील सुशीला अपार्टमेंटशेजारील रस्तासुद्धा धोकादायक बनल्याचे सांगितले जात आहे. कामगाराच्या मृत्यूनंतर याप्रकरणी पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सागर पवार, सहायक उपनिरीक्षक प्रमोद झगडे करीत आहेत. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संबंधित व्यावसायिकाच्या हलगर्जीपणामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला असून, याला जबाबदार असणाऱ्या ‘त्या’ व्यावसायिकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काही जागरुक नागरिकांनी केली आहे.