शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीचा निकाल २२ टक्के

By admin | Updated: November 26, 2014 00:01 IST

शिक्षण मंडळ : गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढली

टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सप्टेंबर/आॅक्टोबर २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचा आॅनलाईन निकाल दुपारी १ वाजता जाहीर झाला. कोकण विभागीय परीक्षा मंडळाचा दहावीचा निकाल २२.४८%, तर बारावीचा निकाल २२.३४% लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे.दहावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातून ७७८ विद्यार्थी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी रत्नागिरीमधून १८२ विद्यार्थी, तर सिंधुदुर्गमधून ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेच्या शेकडा प्रमाणामध्ये रत्नागिरीने बाजी मारली असून, २३.३९ टक्के विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यातून उत्तीर्ण झाले आहेत. दहावीचा राज्यात सर्वाधिक निकाल औरंगाबाद विभागाचा लागला असून, सर्वांत कमी निकाल कोकण विभागाचा लागला आहे.दहावीच्या परीक्षेमध्ये ८३७ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी १८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे शेकडा प्रमाण २२.३४% इतके आहे. सर्वात कमी निकाल एमसीव्हीसी शाखेचा लागला आहे. या शाखेतील ३४ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेच्या २२६ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी २८ विद्यार्थी, कला शाखेचे ३३४ पैकी ६६ विद्यार्थी, तर वाणिज्य शाखेचे २४३ पैकी ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी बाजी मारली असून, मुलींपैकी ७४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ५८३ मुलांपैकी ११३ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या परीक्षेत राज्यात सर्वाधिक निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. (वार्ताहर)मागील तीन वर्षांतील सर्वाधिक निकालकोकण विभागाचा सप्टेंबर/आॅक्टोबर २०१४ चा निकाल हा मागील तीन वर्षातील सर्वाधिक निकाल आहे. दहावीचा सप्टेंबर/आॅक्टोबर २०१२ मध्ये ११.४४%, तर सप्टेंबर/आॅक्टोबर २०१३ मध्ये ११.४५% निकाल लागला होता. यावर्षी या निकालामध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. बारावीचा सप्टेंबर/आॅक्टोबर २०१२ चा निकाल १८%, तर सप्टेंबर/आॅक्टोबर २०१३ चा निकाल १६.३% लागला होता. यावर्षी या टक्केवारीत जवळपास ६ टक्क्यानी े वाढ झाली आहे. निकालाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार : आर. बी. गिरीया परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वाटचाल जोमाने करावी, त्यांना मिळालेले हे यश त्यांच्या अविरत प्रयत्नांचे फळ आहे. तसेच अयशस्वी विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने प्रयत्न करावेत, असे मत कोकण विभागीय मंडळाचे सचिव आर. बी. गिरी यांनी व्यक्त केले. भविष्यात निकालाचा दर्जा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.