शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सेना नगरसेवकांचा नगराध्यक्षांना घेराव

By admin | Updated: December 12, 2014 23:32 IST

रत्नागिरी नगरपरिषद : सभेत गदारोळ, शिवसेना-भाजप पुन्हा आमने-सामने, सत्ताधाऱ्यांनीच मागितले मतदान

रत्नागिरी : नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांनीच ठरावावर मतदान मागून नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांना कोंडीत पकडले. गाळा दुरुस्ती आणि पथदिव्यांच्या निविदा काढण्यावरुन सत्ताधाऱ्यांनी नगराध्यक्षांना आसनासमोर घेराव घालून मतदानाची मागणी केली. त्यामुळे आज झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेना-भाजपा युतीतील मतभेद चव्हाट्यावर आले.नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आज शुक्रवारची सभा जोरदार गाजली. यावेळी दि. २५ आॅगस्ट २०१४ च्या सभेतील विषय क्रमांक १०८ मधील ठराव क्रमांक २,३,४ वरुन सभागृहात शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांनी जोरदार हंगामा केला. माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, अशोक मयेकर व नगरसेवक भय्या मलुष्टे यांनी यावेळी गाळ्याच्या अंतर्गत दुरुस्तीवर नगर परिषदेने खर्च उचलण्याबाबतचा ठराव नामंजूर करण्याची मागणी केली. त्यावर नगरसेवक उमेश शेट्ये यांनी ठराव मंजूर करण्याची मागणी केली. या मागणीवरुन सत्ताधारी नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या ठरावावर मतदान करण्याची कीर, मलुष्टे यांनी मागणी केल्यानंतर बऱ्याच वेळानंतर नगराध्यक्षांनी मागणी मान्य केली. त्यानंतर झालेल्या मतदानामध्ये ठरावाच्या बाजूने १२ विरुध्द १७ असे मतदान झाले. त्यामुळे २, ३, ४ हे अंदाजपत्रकातील विषय नामंजूर करण्यात आले. शहरात पथदीप लावण्याबाबत एकाच कंपनीला काम न देता निविदा काढण्याची मागणी नगरसेवक बंड्या साळवी, भय्या मलुष्टे, मिलिंद कीर यांनी नगराध्यक्षांकडे केली. मात्र, नगराध्यक्षांनी निविदा कशाला, उगाच विरोधाला विरोध कशाला करताय, असे विधान करताच शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर निविदा काढण्याची मागणी करीत सेनेच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन घेराव घातला. निविदा काढण्यावरुन सभागृहात जोरदार गोंधळ माजला होता. यावरुन सभागृहात कामकाज सुमारे १५ मिनिटे सेनेच्या नगरसेवकांनी रोखून धरले होते. अखेर नगराध्यक्षांनी निविदा काढण्याचे मंजूर केल्यानंतर नगरसेवक शांत झाले. (शहर वार्ताहर)